पुसदचे आमदार इंद्रनील नाईकांना 'तो' फोन येणार का ? - Will Indraneel Naik get that phone call ? | Politics Marathi News - Sarkarnama

पुसदचे आमदार इंद्रनील नाईकांना 'तो' फोन येणार का ?

दिनकर गुल्हाने 
गुरुवार, 26 डिसेंबर 2019

केवळ आमदारकीची पहिलीच वेळ हा एक फॅक्‍टर सोडल्यास इंद्रनील यांचे नाव यादीत पक्‍के असल्याचे सांगण्यात येते.

पुसद (जि. यवतमाळ)  : राज्यातील ठाकरे मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या 30 डिसेंबरला होत आहे. या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुसद येथील युवा आमदार इंद्रनील मनोहर नाईक यांना  राज्यमंत्रिपदासाठी शपथ घेण्यासाठी हायकमांडकडून फोन येणार का याविषयी तालुक्यात उत्सुकता आहे . 

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कोट्यातून इंद्रनील नाईक यांना ही संधी मिळण्याची दाट शक्‍यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. महाराष्ट्राचे सत्ताकेंद्र नाईक घराण्याभोवती अनेक वर्षे राहिल्याने या घराण्याचा प्रतिनिधी म्हणून नव्या दमाचे आमदार इंद्रनील नाईक यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी माजी मंत्री मनोहर नाईक यांनी नागपूर येथे अधिवेशन काळात भेट घेतली होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील सर्वच ज्येष्ठ नेते इंद्रनील नाईक यांच्या मंत्रिमंडळातील समावेशासाठी अनुकूल असल्याचे इंद्रनील यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे . 

 सध्यातरी इंद्रनील यांना सर्वच घटक अनुकूल आहेत. केवळ आमदारकीची पहिलीच वेळ हा एक फॅक्‍टर सोडल्यास इंद्रनील यांचे नाव यादीत पक्‍के असल्याचे सांगण्यात येते. इंद्रनील यांच्या रूपाने पुसद मतदारसंघाला राज्यमंत्रिपद मिळेल, अशी जनतेची अपेक्षा आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख