इंदापूरला मंत्रीपदाची लॉटरी लागणार का ?

इंदाूपर तालुक्यातील आमदार दत्तात्रेय भरणे व यशवंत माने यांना मंत्रीपदाची लॉटरी लागणार का? याकडे तालुक्यासह जिल्हाचे लक्ष लागले आहे.
Bharne-Mane-
Bharne-Mane-

वालचंदनगर :  राज्यामध्ये शिवसेना-राष्ट्रवादी कॉग्रेस  व कॉग्रेसच्या महाआघाडीचे सरकार  आले असून येत्या दोन दिवसामध्ये मंत्रीमंडळाचा विस्तार करण्यात येणार आहे.

राष्ट्रवादी कॉग्रेस च्या वाट्याला १० कॅबिनेट व ४ राज्यमंत्रीपद येण्याची शक्यता असून इंदाूपर तालुक्यातील आमदार दत्तात्रेय भरणे व यशवंत माने यांना मंत्रीपदाची लॉटरी लागणार का? याकडे तालुक्यासह जिल्हाचे लक्ष लागले आहे.

इंदापूर विधानसभा मतदार संघातून दत्तात्रेय भरणे व सोलापूर जिल्हातील मोहोळ मतदार संघातून यशवंत माने विजयी झाले आहेत.माने यांचे गाव इंदापूर तालुक्यातील शेळगाव आहे.आमदार भरणे यांनी सलग दुसऱ्यांदा माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला आहे .  


 तालुक्यातील अनेक पाण्याच्या प्रश्‍नासहित अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत. गेल्या वेळी राज्यामध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस व कॉग्रेसचे सरकार नसल्यामुळे आमदार भरणे यांची मंत्रीपद मिळाले नाही. यावेळी भाजप व शिवसेनेचे युती तुटल्यामुळे राज्यामध्ये शिवसेना-राष्ट्रवादी काॅग्रेस - कॉग्रेस चे महाविकास आघाडीचे सरकार आले आहे. नव्याने स्थापन होणाऱ्या सरकारमध्ये धनगर समाजाचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी आमदार भरणे यांनी कॅबिनेट मंत्री करण्याची मागणी  राज्यामधून होवू लागली आहे. 

तशी पत्रे ही सोशल मिडीयावर व्हायरल झाले असून बुलढाणा जिल्हातील चिखली पंचायत समितीच्या सभापती संगिता संजय पांढरे यांनी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना विनंती पत्र लिहिले असून महाविकास आघाडीमध्ये इंदापूरचे आमदार हे धनगर समाजाचे एकमेव आमदार असल्याचा दावा केला असून  कॅबिनेट मंत्रीपद देण्याची मागणी करण्यात आली आहे. 

 भरणे यांनी मंत्रीपद मिळावे अशी इंदापूरकरांची अपेक्षा आहे.  तसेच यशवंत माने हे मोहोळ मतदार संघातून विजयी झाले असून माने यांची मंत्रीपद मिळाल्यास इंदापूर तालुक्याचाही फायदा होणार असून इंदापूर तालुक्याला मंत्रीपदाची लॉटरी लागणार का ? याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com