२३ मे नंतर बारामतीत विजयोत्सव साजरा करण्यासाठी जाणार : चंद्रकांत पाटील

''सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत सरकारने सुरू केलेल्या जनावरांच्या छावण्यात चारा व पाण्याची उत्तम सोय असतानादेखील व शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद आहे, हे आज मी दहा ते पंधरा छावण्यात प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या तोंडून ऐकून व पाहून देखील देशाचे नेते व माजी कृषीमंत्री शरद पवार यांना मात्र राज्यात सुरू असलेल्या छावण्या व टँकर दिसत नाहीत हा संशोधनाचा विषय आहे. येत्या 23 मे नंतर मी बारामतीला विजयोत्सव साजरा करण्यासाठी मी जाणार आहे. त्यावेळी त्यांना हे सांगणार आहे," असे प्रतिपादन महसूल मंत्री
२३ मे नंतर बारामतीत विजयोत्सव साजरा करण्यासाठी जाणार : चंद्रकांत पाटील

भोसे : ''सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत सरकारने सुरू केलेल्या जनावरांच्या छावण्यात चारा व पाण्याची उत्तम सोय असतानादेखील व शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद आहे, हे आज मी दहा ते पंधरा छावण्यात प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या तोंडून ऐकून व पाहून देखील देशाचे नेते व माजी कृषीमंत्री शरद पवार यांना मात्र राज्यात सुरू असलेल्या  छावण्या व टँकर  दिसत नाहीत हा संशोधनाचा विषय आहे. येत्या  23 मे नंतर मी बारामतीला विजयोत्सव साजरा करण्यासाठी मी  जाणार आहे. त्यावेळी त्यांना हे सांगणार आहे," असे प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी भोसे तालुका मंगळवेढा येथे बोलताना केले.

दुष्काळी दौऱ्यानिमित्त  दक्षिण मंगळवेढा  भागातील शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी  महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील पालकमंत्री विजयकुमार देशमुख व आमदार प्रशांत परिचारक भोसे  येथे आले होते. यावेळी बोलताना महसूल मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, "मंगळवेढ्याच्या दक्षिण भागात सिंचनाच्या समस्या भरपूर आहेत. सोलापूर जिल्ह्यातील  सिंचनाच्या प्रश्नाबाबत  आमदार प्रशांत परिचारक यांचा गाढा अभ्यास आहे. त्यांनी त्यावर व्यवस्थित अभ्यास करून पाठपुरावा करावा.  हे प्रश्न सोडविण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. गेल्या पाच वर्षात केंद्र सरकारने सिंचनासाठी महाराष्ट्राला 24 हजार कोटी रुपये दिले आहेत. पाणी ही शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. पाणी दिल्यास शेतकऱ्यांच्या जीवनात स्थैर्य निर्माण होणार आहे. सध्या महाराष्ट्रात 1300 छावण्या सुरु असून साडेआठ लाख जनावरे छावणीत आहेत. चारा पेंड  त्याना  व्यवस्थित  मिळत आहे.''

ते पुढे म्हणाले, "अतिशय चांगली व्यवस्था ठेवण्यात आली असतानादेखील शरद पवारांसारखे नेते महाराष्ट्रात छावण्या नाहीत, टँकर नाहीत, असे म्हणत आहेत. येत्या 23 मे नंतर बारामतीला विजयोत्सव  साजरा करण्यासाठी मी बारामतीला  जाणार आहे. त्यावेळी त्यांना मी हे सांगणार आहे. छावणी चालक अनुदान वाढवून मागत आहेत याही मागणीचा सरकार सकारात्मक विचार करेल शेतकऱ्यांनी दुष्काळात घाबरू नये आमचे सरकार खंबीरपणे शेतकऱ्यांच्या मागे उभे आहे."

आमदार प्रशांत परिचारक यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात दक्षिण भागातील सिंचनाचे विषय अभ्यासपूर्णरित्या मांडत या भागातील पाण्याअभावी जळत असलेल्या फळबागा जगवणेसाठी शेतकऱ्यांना मदत करावी असे सांगितले. यावेळी  बबनराव आवताडे शिवानंद पाटील युनूस शेख शशिकांत चव्हाण औदुंबर वाडदेकर, जिल्हा परिषद सदस्य दिलीप चव्हाण पंचायत समिती सभापती प्रदीप खांडेकर पंचायत समिती सदस्य सुरेश ढोने राजू पाटील भोसेचे सरपंच दत्ता ताटे काशिनाथ पाटील संभाजी पाटील आदींसह मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागातील बहुसंख्य नागरिक  उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com