साताऱ्यातील हे चार आमदार हॅटट्रिक करणार?

सातारा जिल्ह्यतील चार विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार तिसऱ्यांदा रिंगणात उतरले आहेत. ते आमदारकीची हॅट्ट्रिक करणार का याची उत्सुकता आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे, वाईचे मकरंद पाटील, फलटणचे दीपक चव्हाण, आणि माणचे भाजपचे जयकुमार गोरे यांचा समावेश आहे.
Shashikant Shinde - Jaykumar Gore
Shashikant Shinde - Jaykumar Gore

सातारा : सातारा जिल्ह्यतील चार विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार तिसऱ्यांदा रिंगणात उतरले आहेत. ते आमदारकीची हॅट्ट्रिक करणार का याची उत्सुकता आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे, वाईचे मकरंद पाटील, फलटणचे दीपक चव्हाण, आणि माणचे भाजपचे जयकुमार गोरे यांचा समावेश आहे.

सातारा जिल्ह्यात दहा विधानसभा मतदारसंघ होते, पण मतदारसंघ पुनर्रचनेत जावळी आणि खटाव मतदारसंघ रद्द होऊन जावळी साताऱ्याला तर खटाव माणला जोडला गेला. या सर्व घडामोडीत जिल्ह्यातील नेत्यांनाही अडजेस्टेबल राजकारण करावे लागले. यातूनही मतदारांशी नाळ असलेले नेते  पुन्हा पुन्हा निवडून आले. कराड दक्षिण मधून विलासराव उंडाळकर हे तब्बल 34 वर्षें आमदार राहिले. अलीकडे इतकी वर्षे एकाच मतदारसंघातून निवडून येणे सोपे नाही. पण आपल्या आमदारकीची हॅटट्रीक साजरी करण्याची संधी सातारा जिल्ह्यातील चार आमदारांना आली आहे. यामध्ये कोरेगावचे राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे, वाईचे मकरंद पाटील, फलटणचे दीपक चव्हाण आणि माणचे जयकुमार गोरे यांचा समावेश आहे.

शशिकांत शिंदे सर्वात प्रथम जावळीतुन प्रथम १९९९ ला राष्ट्रवादीतून आमदार झाले. त्यानंतर २००४ लाही त्यातूनच दुसऱ्यांदा आमदार झाले. मतदारसंघ पुनर्रचनेत जावळी रद्द झाल्याने त्यांना २००९ मध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोरेगावमधून डॉ. शालिनीताई पाटील यांच्या विरोधात उभे केले. ते निवडून आले. कोरेगावातून ते सलग दोन वेळा आमदार झाले आहेत आता २०१९ ला ते तिसऱ्यांदा रिंगणात आहेत.

मकरंद पाटील हे राष्ट्रवादीकडून २००९ आणि २०१४ असे दोनवेळा वाईतून निवडून आले आहेत. त्यांनी किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांचा सलग दोनवेळा पराभव केला आहे. आता ते तिसऱ्यांदा रिंगणात असून ते भाजपचे मदन भोसले यांच्या विरोधात लढत आहेत.

फलटण २००९ मध्ये राखीव झाला, त्यापूर्वी  राष्ट्रवादीचे जेष्ट नेते रामराजे नाईक निंबाळकर हे तेथून आमदार होते. राखीव झाल्यानंतर रामराजे यांनी दीपक चव्हाण यांना संधी दिली व त्यांना निवडून आणले. ते सलग २००९, २०१४ असे दोन पंचवार्षिक आमदार झाले आहेत. आता २०१९ साठी ते तिसऱ्यांदा राष्ट्रवादीकडून रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात भाजपचे दिगंबर आगवणे रिंगणात आहेत. श्री. चव्हाण आमदारकीची हॅट्ट्रिक करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तसेच पूर्वी माण राखीव होता पण २००९ मध्ये त्याचे आरक्षण निघाले, येथून जयकुमार गोरे प्रथम अपक्ष आमदार झाले. त्यानतर ते काँग्रेससोबत गेले आणि २०१४ मध्ये काँग्रेसच्या चिन्हावर दुसऱ्यांदा आमदार झाले, ते पृथ्वीराज चव्हाण यांचे समर्थक मानले जात होते. आता यावेळी २०१९ च्या निवडणुकीपूर्वी त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता ते तिसऱ्या वेळी याच मतदारसंघातुन निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांचीही आमदारकीची हॅट्ट्रिक होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांचा सामना  त्यांचे बंधू शेखर गोरे आणि प्रभाकर देशमुख यांच्या सोबत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com