सदाभाऊंसाठी माझे कार्यकर्ते पुरसे, चंद्रकांत पाटलाच्या विरोधात मी लढणार - राजू शेट्टी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेमधून भाजपवासी झालेल्या व सध्या कडकनाथ कोंबडी घोटाळ्या प्रकरणातील सदाभाऊ खोत यांना माझे कार्यकर्ते पुरेसे आहेत, अशी तिरकस टिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी येथे केली. तसेच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे विधानसभा निवडणुकीत उतरले तर त्यांच्या विरोधात मी लढणार, असेही जाहीर केले.
Raju Shetty Sadabhau Khot
Raju Shetty Sadabhau Khot

औरंगाबाद : स्वाभिमानी शेतकरी संघटनेमधून भाजपवासी झालेल्या व सध्या कडकनाथ कोंबडी घोटाळ्या प्रकरणातील सदाभाऊ खोत यांना माझे कार्यकर्ते पुरेसे आहेत, अशी तिरकस टिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी येथे केली. तसेच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे विधानसभा निवडणुकीत उतरले तर त्यांच्या विरोधात मी लढणार, असेही जाहीर केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेत शेतकऱ्यांची होणाऱ्या कथित मुस्कटदाबीबद्दल आवाज उठविण्यायासह अन्य मागण्यांसाठी शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली येथील क्रांती चौकातून आक्रोश मोर्चा काढण्यात आला. पैठणगेट, गुलमंडी, सिटीचौक, शहागंजमार्गे हा मोर्चा विभागीय आयुक्‍त कार्यालय परिसरात पोहचल्यानंतर त्याचे सभेत रुपांतर झाले. सभेनंतर पत्रकारांनी त्यांना कडकनाथ कोंबडी प्रकरणी विचारले असता, मंत्री सदाभाऊ खोत यांचाच मुलगा त्यात आरोपी आहे. त्यामुळे याची चौकशी करावीच लागणार. अन्यथा ईडीच्या कार्यालयावर मोर्चा काढेल, असे शेट्टी म्हणाले.

हे देखिल वाचा

उदयनारजेंना उशीराच समज आली - शरद पवार

सदाभाऊंच्या विरोधात निवडणुक लढणार का, असे विचारले असता शेट्टी म्हणाले की, त्यांच्यासाठी माझे कार्यकर्तेच पुरेसे आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील विधानसभा निवडणुकीत उतरण्यासाठी मतदारसंघाची चाचपणी करीत आहेत. जर ते निवडणुकीत उतरले तर आपण त्यांच्या विरोधात निवडणुक लढवणार, असे शेट्टी यांनी जाहीर केले.

पोरं खवळली तर नरडीचा घोट घेतील
मोठ्या कष्टाने एक -एक परीक्षा उतीर्ण झाले तरीही नोकरी देण्याऐवजी सरकार तरुणांच्या जिवांशी खेळतयं, आत्तापर्यंत सहन केलं मात्र, जर पोरं खवळली तर ते सरकारच्या नरडीचा घोट घेतील. तसेच आंदोलनादरम्यान, आमच्या आया- बहिणींकडे सरकारने वाकड्या नजरेनी पाहू नये, अन्यथा आम्हाला तुमचे डोळे काढावे लागतील, असा इशाराही शेट्टी यांनी दिला.

महापोर्टल भाजपाच्या एजन्टांसाठीच?
नोकर भरती करण्यासाठी सुरु केलेल्या महापोर्टलवर सर्वस्तरातून संशय घेतला जातोय. ते का बंद केले जात नाही ? महापोर्टल भाजपाच्या एजन्टांसाठीच सुरु केले काय, असा सवाल शेट्टी यांनी उपस्थित केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com