खडकवासल्याच्या पाण्यासाठी लढा उभारणार : प्रवीण माने

खडकवासल्याच्या पाण्यासाठी लढा उभारणार : प्रवीण माने

वालचंदनगर : खडकवासला प्रकल्पातून इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना तरतुदीप्रमाणे पाणी मिळत नसून तालुक्यातील शेतकऱ्यावर अन्याय होत आहे. शेतकऱ्यांची पिके जळून चालली असून शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी मिळण्यासाठी लढा उभा करणार असल्याचा इशारा पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी दिला.

माने यांनी सांगितले की, खडकवासला प्रकल्पातून इंदापूर तालुक्यातील शेतीसाठी ४ ते ५ आवर्तने पुर्ण क्षमतेने देण्याची गरज आहे.  कालव्याच्या  पाण्यावरती तालुक्यातील सुमारे २४ हजार हेक्टर सिंचनाचे क्षेत्र अवलंबून आहे. मात्र गेल्या काही वर्षापासून खडकवासल्याचे पाणी  तरतुदीप्रमाणे इंदापूर तालुक्याला मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे.  शेतकऱ्यांची हजारो एकरातील पिके जळून खाक झाली असून शेतीव्यवसाय धोक्यात आला आहे.

 खडकवासल्याचे बारामती,दौंड, हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांना खडकवासल्याचे पाणी मिळत आहे. मात्र इंदापूर कालव्याच्या `टेल`ला असल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही. `टेल टू हे`ड पद्धतीने शेतीच्या पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. तालुक्यातील शेटफळगढे येथे कालव्याचे पाणी मोजण्याचा गेज आहे. मात्र पाटबंधारे विभाग  शेतकऱ्यांना कालव्याच्या पाणी माेजून देण्याऐवजी दिवसावरती पाणी देते.  शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी  तालुक्यातील शेतकऱ्यांना  तरतुदीप्रमाणे कालव्याचे पाणी मोजून देण्याची गरज आहे.  सध्या खडकवासला प्रकल्पातील धरणामध्ये शंभर टक्के पाणीसाठा असून प्रशासनाने तातडीने शेतकऱ्यांच्या शेतीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली असून पाणी  पुरेसे पाणी न दिल्यास लढा उभारणार असल्याचे माने यांनी सांगितले.

चालू वर्षीही पावसाने इंदापूर तालुक्याकडे पाठ फिरवली असून तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. पावसाळ्यातही पिण्याच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांना वणवण भटकंती करावी लागत आहे .तसेच जनावरांच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. तालुक्यातील १०  चारा छावणी   १२ हजारापेक्षा जास्त जनावरे असून ३१ ऑगस्ट रोजी छावण्यांची मुदत संपत असून मुदतवाढीसाठी  जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे प्रवीण माने यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com