अधिवेशन काळातच होणार एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेश?

आज सायंकाळी सहा वाजता नागपुरात माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या सत्काराचा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे याच कार्यक्रमात खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार असल्याचा अंदाज राष्ट्रवादीच्या गोटातील काही कार्यकर्त्यांनी 'सरकारनामा' जवळ बोलून दाखविला
Will Ekanath Khadase Enter NCP in Nagpur Assembly Session Period
Will Ekanath Khadase Enter NCP in Nagpur Assembly Session Period

नागपूर : भारतीय जनता पार्टीचे नाराज नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे कालपासून नागपुरात आहेत. आज किंवा उद्या ते येथेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

काल दुपारी 4 45 वाजता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नागपुरात आगमन झाले. त्यापूर्वीच एकनाथ खडसे दुपारी 3.30 वाजता नागपुरात दाखल झाले होते. ते हॉटेल रेडिसन ब्ल्यू येथे थांबले होते. काल संध्याकाळी सिव्हिल लाइन्स येथील प्रेस क्लबमध्ये महाविकास आघाडीच्या आमदारांसोबतची बैठक आटोपल्यावर शरद पवार हॉटेल रेडिसन ब्ल्यू येथे गेले. तेथेच खडसे आणि पवार यांची भेट झाल्याचीही माहिती आहे. 

आज सायंकाळी सहा वाजता नागपुरात माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या सत्काराचा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे याच कार्यक्रमात खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार असल्याचा अंदाज राष्ट्रवादीच्या गोटातील काही कार्यकर्त्यांनी 'सरकारनामा' जवळ बोलून दाखविला, तर काहींच्या मते एकनाथ खडसे यांच्या मतदारसंघात 20 डिसेंबर रोजी त्यांचा प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. एकनाथ खडसे म्हणजेच नाथा भाऊंच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशारून भाजपा आणि राष्ट्रवादीच्याही कार्यकर्त्यांमध्ये कमालीची उत्सुकता बघायला मिळत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com