जयंत पाटलांचे साडू देशमुखांना मुख्यमंत्री खरंच आमदार करणार?   

..
satyajit deshmukh -cm
satyajit deshmukh -cm

कामेरी: सत्यजीत देशमुख यांना शिवाजीराव देशमुख ज्या सभागृहात होते त्या सभागृहात आमदार म्हणून घेवू ,असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी कामेरी येथे विधानसभा प्रचारसभेवेळी केले. हा शब्द ते पाळणार का?

असेच आश्र्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शिवाजीराव नाईक यांना मागील निवडणुकीत कॅबिनेट मंत्रिपदाचे आश्वासन दिले होते ते फक्त आश्वासनच राहिले, त्यामुळे मुख्यमंत्री यांनी दिलेल्या आश्वासनाची चर्चा आत्तापासूनच रंगली आहे. 

विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्यजीत देशमुख यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केला.  हा प्रवेश करण्याची दोन कारणे त्यांनी नमूद केली . एक म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांना चांगली वागणूक दिली नाही तर दुसरे कारण आपले साडू जयंत पाटील यांनी आजवर आपल्यावर अन्याय केला असल्याचे बोलून दाखवले. 

त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तो धागा पकडत देशमुखांना विधान परिषदेवर आमदार करण्याचे आश्वासन दिले.  त्यामुळे देशमुखांचे कार्यकर्ते मोठे उत्साही झाले होते . मात्र हा शब्द मुख्यमंत्री कितपत पाळणार हा येणारा काळच ठरवेल. कारण मागील 2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवाजीराव नाईक यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शिवाजीराजांना तुम्ही निवडून द्या आम्ही कॅबिनेट मंत्री करू असे आश्वासन दिले होते पण एखाद्या महामंडळाची सुद्धा जबाबदारी सोपंवली नाही . त्यामुळे कार्यकर्त्यांनी नाराजी होती . 

आता या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी सत्यजीत यांना आमदारकीचे आश्र्वासन दिले. शिराळा विधानसभा मतदारसंघात भाजपला यश मिळेल असे वाटत होते पण त्यांच्या पदरी निराशा पडली . या निवडणुकीत माजी आमदार शिवाजीराव नाईक यांचे मतदारसंघावर वर्चस्व पूर्णपणे कमी झाले आहे.  

त्यामुळे भाजपला सत्यजीत देशमुख यांना पक्षवाढीसाठी पाठबळ द्यावे लागेल ,असे काही जाणकार मंडळीकडून बोलले जात आहे. तर काही मंडळी कडून सत्यजीत देशमुख यांनी भाजपमध्ये जावून चूक केल्याचे बोलले जात आहे मात्र या साऱ्यात सत्यजीत देशमुख यांची भाजपमधील इमेज वाढते का ? हा येणारा काळच ठरवणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com