Will Develop Igatpuri as Best Hill Station Say Chagan Bhujbal | Sarkarnama

इगतपुरी येथे राज्यातील उत्तम हिल स्टेशन करणार : छगन भुजबळ

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

राज्यातील उत्तम असे हिलस्टेशन इगतपुरी येथे उभारण्यात येणार आहे. त्यामुळे इगतपुरीच्या पर्यटकांना चालना मिळेल, असा विश्वास अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी येथे व्यक्त केला

नाशिक  : जनतेने जे जे प्रश्न मांडले ते प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही व आमचे सरकार प्रयत्नशील आहे. राज्यातील उत्तम असे हिलस्टेशन इगतपुरी येथे उभारण्यात येणार आहे. त्यामुळे इगतपुरीच्या पर्यटकांना चालना मिळेल, असा विश्वास अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी येथे व्यक्त केला.

घोटी ग्रामपालिका आणि पशुसंवर्धन विभागातर्फे डांगी जनावरांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन त्यांनी केले. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, जिल्ह्यातील नागरिकांनी जे जे प्रश्न आपल्या समोर मांडले ते सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील आहे. नाशिकच्या  विकासाच्या दृष्टीने इगतपुरी येथे हिल स्टेशन निर्माण करण्यात येणार आहे. त्यासाठी १० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच  दादासाहेब फाळके चित्रपट सृष्टी निर्माण केली जाणार आहे. त्याचबरोबर नाशिकमध्ये लवकरच वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. 

राज्यातील  जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळवून दिला जाईल. त्यात दोन लाखाहून अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना देखील विशेष योजनेतून कर्जमाफीचा लाभ मिळवून दिला जाईल असे सांगत शेतकरी आणि आदिवासी बांधवांची प्रश्न सोडविण्याची जबाबदारी आपण घेतली असून ती पूर्ण केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी आमदार हिरामण खोसकर, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आ. हिरामण खोसकर, माजी आमदार शिवराम झोले, पांडुरंग गांगड, काशिनाथ मेंगाळ,  बाजार समितीच्या सभापती इंदूताई मेंगाळ, समाज कल्याण सभापती सुशीला मेंगाळ, जिल्हा परिषद सदस्य उदय जाधव,  संदीप गुळवे उपस्थित होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख