इंदापूरचे दत्तात्रेय भरणे व  यशवंत माने अजित पवारांसोबत जाणार का?

इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे व मोहोळचे आमदार यशवंत माने हे दोघेही अजित पवार यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. आता ते अजित पवारांसोबत जाणार का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
Will Dattatray Bharane and Yashwant Mane Go with Ajit Pawar
Will Dattatray Bharane and Yashwant Mane Go with Ajit Pawar

वालचंदनगर : इंदापूर तालुक्यातील आमदार दत्तात्रेय भरणे व यशवंत माने हे दोघे मुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक व विश्‍वासू आमदार आहेत येणाऱ्या काळामध्ये आमदार भरणे व माने हे पवार यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार का? अशा प्रश्‍न उपस्थित होवू लागला आहे.

इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे हे अजित पवार यांचे लाडके आमदार म्हणून ओळखले जातात. अजितदादांची भरणेमामावर कृपा असल्याने भरणे मामांना छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक ते इंदापूरचे आमदार होण्याची संधी मिळाली. पवार यांनी मामांना पुणे जिल्हा परिषदेचे व पुणे  जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष पद ही बहाल केले. तसेच २०१४ व २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भरणे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल्यामुळे भरणे यांना दोन वेळा आमदार होणे शक्य झाले.

तसेच २००९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार भरणे यांनी बंडखोरी केली होती. यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भरणे यांना उमेदवारी अर्ज माघारी घेण्यास सांगितले होते. मात्र भरणे यांनी अजित पवारांच्या पाठिंब्यामुळे बंडखोरी केल्याची चर्चा सुरु होती. 

भरणे यांचा या निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतरही पवार यांनी २०१२ साली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बहाल  केले होते. यामुळे २०१४ च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटलांचा सहज पराभव करता आला.  अजित पवार यांनी कमी कालावधीमध्ये सर्वात जास्त पदे भरणे यांना दिली आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मुंबईमध्ये बैठक होत असून या बैठकीला भरणे दांडी मारण्याची शक्यता आहे. त्यांच्याशी संपर्क केला असता विवाह समारंभामध्ये असल्याचे सांगून प्रतिक्रिया देण्याचे टाळले.

तर इंदापूरचे यशवंत माने हे सोलापूर जिल्हातील मोहोळ मतदार संघातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले आहेत. माने ही अजित पवारांचे विश्‍वासू आमदार आहेत. मात्र ते सध्या मुंबईतील बैठकीसाठी रवाना झाले असून त्यांनी ही प्रतिक्रिया देण्याचे टाळले असून सोशल मिडीयावर त्यांचा मी शरद पवार सोबत असून त्यांच्या सोबत काम करणार असल्याचा फेसबुकचा स्कीनशॉट व्हायरल होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com