Will Congress Tushar Shewale will be Able to Check Shivsena Dada Bhuse | Sarkarnama

मालेगाव बाह्यमध्ये कॉंग्रेसचे तुषार शेवाळे राज्यमंत्री भुसेंचा वारु रोखणार?

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

मालेगाव बाह्य मतदारसंघात शिवसेनेचे राज्यमंत्री दादा भुसे चौथ्यांदा मतदारांना सामोरे जात आहेत. मात्र कॉंग्रेस आघाडीचे डॉ. तुषार शेवाळे यांनी केलेल्या प्रचाराच्या नियोजनामुळे भुसे जिल्ह्यातील प्रचाराऐवजी मतदारसंघातच अडकले आहेत. डॉ. शेवाळे यांना गावोगावी मतदारांकडून स्वागताबरोबरच निधी दिला जात आहे. त्यामुळे राज्यमंत्री भुसे यांचा वारु रोखण्यात ते यशस्वी होतील का? याचीच सध्या चर्चा आहे.

मालेगाव : मालेगाव बाह्य मतदारसंघात शिवसेनेचे राज्यमंत्री दादा भुसे चौथ्यांदा मतदारांना सामोरे जात आहेत. मात्र कॉंग्रेस आघाडीचे डॉ. तुषार शेवाळे यांनी केलेल्या प्रचाराच्या नियोजनामुळे भुसे जिल्ह्यातील प्रचाराऐवजी मतदारसंघातच अडकले आहेत. डॉ. शेवाळे यांना गावोगावी मतदारांकडून स्वागताबरोबरच निधी दिला जात आहे. त्यामुळे राज्यमंत्री भुसे यांचा वारु रोखण्यात ते यशस्वी होतील का? याचीच सध्या चर्चा आहे.

या मतदारसंघात शिवसेनेचे नेते व पदाधिकाऱ्यांनी मोसम पुलावरील मराठी शाळेच्या जागेवर महात्मा जोतिबा फुले स्मारक करण्यासाठी सहकार्य केले नाही. याउलट त्यास अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. त्याचा निषेध म्हणून समितीचे कॉंग्रेस उमेदवार डॉ. शेवाळे यांना बिनशर्त जाहीर पाठिंबा दिला आहे. समितीचे निमंत्रक गुलाब पगारे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत हे जाहीर केले. या वेळी धर्मा भामरे, भगवान आढाव, श्रीराम सोनवणे, कैलास तिसगे, नरेंद्र वसईकर, सोमनाथ अहिरराव, सुनील चौधरी, किरण पगारे, शरद पानपाटील आदींसह समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. सातत्याने विविध संघटना, पदाधिकारी डॉ. शेवाळे यांना पाठींबा जाहीर करीत आहे. प्रचारात त्यांचा थेट मतदारांशी संपर्क सुरु आहे. त्यामुळे शिवसेनेवर नाराज मतदारांचा सहभाग वाढत आहे. राजकीयदृष्ट्या जागरुक मतदारसंघ आणि पारंपारीक हिरे कुटुंबीयांचाही शेवाळे यांना पाठींबा असल्याने ही निवडणूक चुरशीची होत आहे.

मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, आरपीआय (गवई गट), पीपल्स रिपब्लिकन (कवाडे गट) आदी मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार डॉ. तुषार शेवाळे यांच्या प्रचारार्थ मंगळवारी (ता. 8) सोयगावमध्ये रॅली काढण्यात आली. सोयगाव, नववसाहत परिसरात रॅली काढत डॉ. शेवाळे यांनी मतदारांशी संवाद साधला.

सटाणा नाका भागातील भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयापासून रॅलीस सुरवात झाली. सोयगाव कमान, राजवाडा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, मराठी शाळा, तुळजाभावानी मंदिर, भवानी मंदिर, पार्श्‍वनाथनगर, गणपती मंदिर, जिजामातानगर, दौलतीनगर, जयरामनगर, विनयमंदिर शाळा मार्गावरून इंदिरानगर येथे रॅलीची सांगता झाली. डॉ. शेवाळे यांचे ठिकठिकाणी औक्षण करण्यात आले. रॅलीत महाआघाडीचे प्रसाद हिरे, अशोक बच्छाव, डॉ. राजेंद्र ठाकरे, नगरसेवक नंदू सावंत, संदीप पाटील, सचिन बोरसे, कैलास बच्छाव, अजिंक्‍य शेवाळे यांच्यासह शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. रॅलीत युवकांची संख्या लक्षणीय होती.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख