Will Congress oppose Narayan Rane's indirect entry in alliance ? | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

चोथ्या फेरीत आदित्य ठाकरे 19954 मतांनी आघाडीवर
दहाव्या फेरीअखेर धनंजय मुंडे 13 हजार मतांनी आघाडीवर
साताऱ्यातून उदयनराजे 32 हजार मतांनी पिछाडीवर
रोहित पवार आठव्या फेरीअखेर 12170 मतांनी आघाडीवर
येवला मतदारसंघ- छगन भुजबळ ३४७२ मतांनी आघाडी
मालेगाव बाह्य - शिवसेनेचे दादा भुसे 21 हजार 913 मतांनी आघाडीवर.
कुलाबा मतदार संघात भाजप चे राहुल नार्वेकर 7 हजार मतांनी आघाडीवर
चिंचवड - भाजपचे लक्ष्मण जगताप 7785 मताने आघाडीवर.
भुसावळ विधानसभा - भाजपाचे आमदार संजय सावकारे यांना सातव्या फेरीअखेर १३६१५ मतांची आघाडी
मलबार हिल मतदार संघात भाजप चे मंगल प्रभात लोढा आघाडीवर
तिसऱ्या फेरीत शिवसेनेचे आदित्य ठाकरे 16 हजार मतांनी आघाडीवर
सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघ उदयनराजे भोसले दुसऱ्या फेरीत 10500 हजार मतांनी पिछाडीवर
सावंतवाडी शिवसेनेनेचे दीपक केसरकर दुसऱ्या फेरीत 703 मतांनी आघाडीवर
कराड दक्षिण मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण 1200 मतांनी आघाडीवर
सातारा : सातारा विधानसभा भाजपचे शिवेंद्रराजे भोसले आघाडीवर
भोकर मतदारसंघात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आघाडीवर
भुसावळला पहिल्या फेरीत भाजपचे आमदार संजय सावकारे यांना 3960 मतांची आघाडी.
इंदापूर हर्षवर्धन पाटील 1000 मतांनी आघाडीवर
राज्यात मतमोजणीला सुरुवात

सिंधुदुर्ग नारायण राणेंना सोडण्यास काँग्रेस विरोध करणार ? 

सरकारनामा
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

कॉंग्रेसचा राणे यांना महाआघाडीत घेण्यास विरोध आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि नारायण राणे यांचे वैर सर्वांनाच माहीत आहे.

मुंबई:  आगामी लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 19 आणि 20 डिसेंबरला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात जागावाटपाची चर्चा होणार आहे. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसने सिंधुदुर्गची जागा नारायण राणेंसाठी मागितली  काँग्रेस विरोध करणार अशी चिन्हे दिसत आहेत . 

सिंधुदुर्गची जागा राष्ट्रवादीला हवी असून, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना तेथून राष्ट्रवादीतर्फे निवडणूक लढवायची असल्याची चर्चा आहे. परंतु जागावाटपात हा मतदारसंघ कॉंग्रेसकडे आहे.

कॉंग्रेसचा राणे यांना महाआघाडीत घेण्यास विरोध आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि नारायण राणे यांचे वैर सर्वांनाच माहीत आहे. खुद्द चव्हाण यांचा राणेंना विरोधच आहे. त्यामुळे राणेंसाठी ही जागा राष्ट्रवादीला सोडण्यास कॉंग्रेस तीव्र विरोध करण्याची शक्‍यता आहे.  

लोकसभेच्या महाराष्ट्रात 48 जागा आहेत. त्यापैकी 40 जागांबाबत कोणताच वाद नाही, असे सांगण्यात येते. आठ जागांवर दोन्ही पक्ष दावा करत असून, वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत यावर चर्चा करून तोडगा काढला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.

जागावाटपाची महत्त्वपूर्ण बैठक विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी होणार आहे. 

ज्या जागांबद्दल वाद आहेत त्यात यवतमाळ, पुणे , औरंगाबाद अशा काही मतदारसंघांचा समावेश आहे.  या सर्वच मुद्यांवर दोन दिवसीय बैठकीच्या चर्चेतून मार्ग काढण्यात येण्याची शक्‍यता आहे. दोन्ही पक्षांचे ज्येष्ठ नेते या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. भाजप शिवसेना युतीची स्पष्टता नसताना कॉंग्रेस राष्ट्रवादीने जागावाटपात आघाडी घेतली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख