कॉंग्रेस महाआघाडी दिंडोरी मतदारसंघ 'माकप' साठी सोडणार?

लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस महाआघाडीच्या जागावाटपाचा 'फॉर्म्युला' अंतिम टप्प्यात आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाला सोडणार असल्याची प्राथमिक चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगीतले.
कॉंग्रेस महाआघाडी दिंडोरी मतदारसंघ 'माकप' साठी सोडणार?

नाशिक : लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस महाआघाडीच्या जागावाटपाचा 'फॉर्म्युला' अंतिम टप्प्यात आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाला सोडणार असल्याची प्राथमिक चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगीतले. या पक्षाला राज्यातील हा एकमेव मतदारसंघ सोडण्यात आला आहे. मतदारसंघातील उमेदवार कोण, हा नवा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून उमेदवार सुचविला जाण्याची शक्‍यता आहे.

यासंदर्भात मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी यासंदर्भात दुजोरा दिला. 'माकप'ने राज्यातील पालघर आणि दिंडोरी हे दोन लोकसभा मतदारसंघ मागितले होते. तसा प्रस्ताव गेल्या महिन्यातच देण्यात आला होता. दोन दिवसांत झालेल्या जागावाटपाच्या अंतिम चर्चेत त्यावार पुन्हा चर्चा झाली. त्यावेळी पक्षाने पालघर मतदारसंघावरील आपला दावा सोडला. दिंडोरी मतदारसंघ देण्याचा लेखी नवा प्रस्ताव दोन्ही कॉंग्रेसच्या नेत्यांना दिला. आज मुंबईत विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवास्सथानी जागावाटपाविषयी अंतिम चर्चा झाली. त्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे असेलला दिंडोरी मतदारसंघ पक्षाने माकपला सोडण्यास अनुकुलता दर्शविल्याचे कळते.

या निर्णयाने मतदारसंघातील राजकीय समीकरणेच बदलणार आहेत. माकपची या मतदारसंघात संघटनात्मक बांधणी पेठ, सुरगाणा या दोन तालुक्‍यांत प्रभावी आहे. लोकसभेच्या २०१४ मधील निवडणुकीत पक्षाचे उमेदवार हेमंत वाघेरे यांना ७२५९९ तर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या भारती पवार यांना २९५१६५ मते मिळाली होती. मतदारसंघात माकपचे जे. पी. गावीत (कळवण) तर माजी मुख्यमंत्री छगन भुजबळ (येवाल), पंकज भुजबळ (नांदगाव), नरहरी झीरवळ (दिंडोरी) हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आहे. अन्य दोन डॉ. राहुल आहेर (चांदवड) आणि अनिल कदम (निफाड) हे भाजप व शिवसेनेचे आमदार आहेत. या स्थितीत माकप उमेदवारी कोणाला देणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com