शिवेंद्रसिंहराजेंच्या आग्रहाने हद्दवाढीवर मुख्यमंत्री मोहर उमटणार?

सातारा शहराच्या हद्दवाढीसाठी गेली चार दशके शहर परिसरातील लोकांना वाटच पाहावी लागत आहे. अनेकदा प्रस्ताव देवून, त्यावर हरकती, सुनावण्या होवूनही त्याबाबत अंतिम निर्णय होऊ शकला नव्हता. काही राजकीय गणिते जुळविण्यासाठी काहींचा त्यास विरोध असल्याने ही हद्दवाढ भाजप सरकारच्या काळातही रखडली.
Will CM Uddhav Thackeray Accepct Satara Boundary Extension Demand of Shivendraraje
Will CM Uddhav Thackeray Accepct Satara Boundary Extension Demand of Shivendraraje

सातारा : बहुचर्चित, बहुप्रलंबित साताऱ्याच्या हद्दवाढीवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी डिजिटल मोहर उमटवली खरी. पण, सरकार बदलताच हद्दवाढीची 'दिशा'ही फिरली आहे. अंतिम टप्प्यात असलेल्या हद्दवाढीवर आता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे मोहर उमटविणार का? त्यासाठी हद्दवाढीसाठी प्रयत्नशील असलेल्या आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

सातारा शहराच्या हद्दवाढीसाठी गेली चार दशके शहर परिसरातील लोकांना वाटच पाहावी लागत आहे. अनेकदा प्रस्ताव देवून, त्यावर हरकती, सुनावण्या होवूनही त्याबाबत अंतिम निर्णय होऊ शकला नव्हता. काही राजकीय गणिते जुळविण्यासाठी काहींचा त्यास विरोध असल्याने ही हद्दवाढ भाजप सरकारच्या काळातही रखडली. दरम्यान, शिवेंद्रसिंहराजेंनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने हद्दवाढीचे घोडे गंगेत न्हावून निघत होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी महाजनादेश यात्रेदरम्यान सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी साताऱ्याच्या हद्दवाढीला मान्यता दिली होती. फडणवीस यांनी डिजिटल स्वाक्षरी केल्याचे शिवेंद्रसिंहराजेंनी सांगितले होते. 

मात्र, निवडणुकीनंतर महाराष्ट्र विकास आघाडी सत्तेत आली आणि हद्दवाढ पुन्हा एकदा राजकीय घोळात अडकून पडली आहे. जनगणनेची प्रक्रिया राबविली जाणार असून, त्यासाठी वाढीव शहराची सीमा निश्‍चित करावी लागणार आहे. त्याची 31 डिसेंबरपर्यंतची मुदत आहे. पूर्वतयारी म्हणून जनगणनेच्या प्रक्रियांमध्ये कोणाचीही दुबार गणना होऊ नये, तसेच कुणीही गणनेतून सुटू नये, यासाठी पालिका, महसुली गावे, तालुके, उपविभाग व जिल्हा यांच्या सीमा व हद्दीत बदल होत असल्यास त्याबाबतचे प्रस्ताव 31 डिसेंबरपूर्वी अंतिम करणे व त्याची अंमलबजावणी त्यापूर्वी करणे आवश्‍यक आहे. या बदलांची माहिती जनगणना संचालनालय आणि मुख्य सचिव कार्यालयांना द्यावी लागणार आहे. प्रशासकीय विभागाच्या सीमांमध्ये एक जानेवारी 2020 ते 31 मार्च 2021 या कालावधीत कोणताही बदल केला जाणार नाही.

हद्दवाढीला मंत्रालयीन स्तरावरील ग्रामविकास विभाग, नगरविकास विभागाने यापूर्वीच हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री ठाकरे यांची स्वाक्षरी होवून नोटिफिकेशन निघणे बाकी आहे. ही मोहर उमटण्यासाठी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण राहणार आहे.

साताऱ्याची हद्दवाढ निश्‍चित होईल. त्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही. शहराच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय असून, त्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेणार आहे -शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com