शिवसेना-राष्ट्रवादीच्या मंत्रिमंडळात छगन भुजबळ असणार?

शिवसेना आणि राष्ट्रवादीचे सरकार स्थापन होण्याआधीच विविध अटकळी बांधण्यात येत आहेत...
शिवसेना-राष्ट्रवादीच्या मंत्रिमंडळात छगन भुजबळ असणार?

पुणे : शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या संभाव्य मंत्रिमंडळात छगन भुजबळ यांचा समावेश असणार का, याची उत्सुकता भुजबळ यांच्या समर्थकांना असणार आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसने इतर पक्षांसोबत वाटाघाटी करण्यासाठी नेमलेल्या समितीत भुजबळ यांचा समावेश केल्याने त्यांचे पक्षातील मानाचे पान अजून कायम असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शिवसेना त्यांच्याबाबतचे झाले गेले विसरून जाणार, का याची आता प्रतिक्षा आहे. 

भुजबळ हे शिवसेना सोडून काॅंग्रेसमध्ये आले होते. त्या वेळी बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्यवर कठोर प्रहार केले होते. राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि काॅंग्रेसच्या सत्ताकाळात भुजबळ हे गृहमंत्री झाले. त्या वेळी बाळासाहेबांना अटक करण्याची कारवाई झाली होती. त्याचे पडसाद नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या काळातही राष्ट्रवादीत उमटले होते.

ही कारवाई योग्य नव्हती, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले होते. या मतावर भुजबळ यांनी तेव्हा अजित पवार हे लहान होते, अशा शब्दांत टोला लगावला होता. भुजबळ हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा निवडणुकीच्या आधी उठल्या होत्या. त्यामुळे काही कट्टर शिवसैनिकांनी `मातोश्री`वर जाऊन त्याविरोधात मत नोंदविले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी भुजबळ यांना प्रवेश देणार नसल्याचे स्पष्ट केले होते.

आता राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा एकत्र येत असल्याने जुन्या जखमा पुन्हा उगाळल्या जाणार नाहीत, असेही सांगण्यात येते. तसेच नारायण राणे यांच्याबाबत जशी कटुता शिवसेनेला आहे तेवढी भुजबळ यांच्याबाबत नाही. तुरुंगातून सुटून आल्यानंतर भुजबळ हे `मातोश्री`वर पण जाऊ आले होते. त्यामुळे या दोन्ही पक्षांचे सरकार आले तर शिवसेना भुजबळांच्या नावाला विरोध करणार नाही, अशीही चर्चा आहे. भुजबळ यांच्याविरोधात ईडीने कारवाई केल्याने त्यांना तुरुंगवास भोगावा लागला होता. त्याचा कायदेशीर मुद्दा उपस्थित केला जाईल का, याची शंका भुजबळ समर्थकांना आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com