भाजप दाखवणार शिवसेनेला ठेंगा? २८८जागासाठी लढण्यासाठी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे दिले आदेश

लोकसभेला गरज पडली असताना शिवसेनेला सोबत करणाऱ्या भारतीय जनता पक्षाने विधानसभेला मात्र लाथाडले आहे. राज्यात विधानसभेच्या 288 जागांवर तयारी करण्याचे आदेश भाजपच्या राज्य प्रभारी सरोज पांडे यांनी आज येथे दिले. गोरेगाव येथे भाजपच्या कार्यकारिणीची आज बैठक सुरू आहे. त्या बैठकीत पांडे यांनी ही घोषणा दिली आहे.
भाजप दाखवणार शिवसेनेला ठेंगा? २८८जागासाठी लढण्यासाठी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे दिले आदेश

मुंबई : लोकसभेला गरज पडली असताना शिवसेनेला सोबत करणाऱ्या भारतीय जनता पक्षाने विधानसभेला मात्र लाथाडले आहे. राज्यात विधानसभेच्या 288 जागांवर तयारी करण्याचे आदेश भाजपच्या राज्य प्रभारी सरोज पांडे यांनी आज येथे दिले. गोरेगाव येथे भाजपच्या कार्यकारिणीची आज बैठक सुरू आहे. त्या बैठकीत पांडे यांनी ही घोषणा दिली आहे. या घोषणेमुळे 2014 च्या विधानृसभेचे चित्र निर्माण होणार असल्याचे जवळपास स्पष्ट झालै आहे.

राज्यात 288 जागांवर भाजपच निवडून येईल अशी तयारी करा,असे आवाहन भाजपच्या राज्यप्रभारी सरोज पांडे यांनी केले. तर आपल्या सहयोगी पक्षांना यामुळे मदतच होईल असे आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले. जागा वाटप, युती या बद्दल देवेंद्रजी योग्य ते निर्णय घेतील असेही त्यांनी स्पष्ट केले. भाजपाच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठकीत ते बोलत होते. राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे, आशिष शेलार, मुंबई भाजपा अध्यक्ष मंगलप्रभात लोंढा, एकनाथ खडसे यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपाचे कार्यकर्ते बैठकीसाठी उपस्थित आहेत.

गेल्या पाच वर्षात 50 हजार कोटी पेक्षा जास्त पैसे शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झाल्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. प्रदेशाध्यक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीच्या प्रतिमेला तडा जाईल असे वर्तन माझ्या हातून होणार नाही. बुथ रचनेच महत्वाचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले यामुळेच 2014 जिंकलो आता लोकसभा जिंकलो आणि विधानसभाही जिंकणार असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला. 

ईव्हीएममध्ये घोटाळा तर मग बारामती कशी जिंकली ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. असे असेल तर सुप्रिया सुळे यांनी राजीनामा द्यावा असा टोलाही त्यांनी लगावला. वंचितमुळे काँग्रेसला फटका आणि भाजपाला फायदा झाला असे म्हणता येणार नाही. वंचितबिंचित काही नाही आपला विजय बूथ रचना आणि पन्ना प्रमुखांमुळे झाल्याचे ते म्हणाले. 

काँग्रेसचा 'बरमुडा' झाला आहे अशी बोचरी टीका भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केली. चंद्रकांत दादा यांना भारतीय जनता पार्टीचा झेंडा मी हाती दिला आहे. या झेंडयाचा मजबूत दांडाही दिला आहे. चंद्रकांत दादांचा अनुभव दांडगा आहे ते पक्ष आणखी वाढवणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. सामान्य कार्यकर्त्यांना कामातून संधी देणारा पक्ष भाजपा असून काँग्रेसचा बरमोडा झाला आहे अशी बोचरी टीका भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केली. चंद्रकांत दादा यांना भारतीय जनता पार्टीचा झेंडा मी हाती दिला आहे. या झेंडयाचा मजबूत दांडाही दिला आहे. चंद्रकांत दादांचा अनुभव दांडगा आहे ते पक्ष आणखी वाढवणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सामान्य कार्यकर्त्यांना कामातून संधी देणारा पक्ष भाजपा असून गरिबांनी काँग्रेसला हटवला आणि गरिबांचा पंतप्रधान नेमल्याचे ते म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com