गंगापूरमधून डोणगांवकर पती-पत्नी इच्छुक, पण भाजप मतदारसंघ सोडणार का?

जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्ष अॅड. देवयानी डोणगांवकर, त्यांचे पती कृष्णापाटील डोणगांवकर हे दोघे पती-पत्नी iगंगापूर-खुल्ताबादमतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. याशिवाय माजी आमदार अण्णासाहेब माने यांचे चिरंजीव व युवासेनेचे जिल्हाधिकारी संतोष माने हे देखील मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. परंतु, भाजपचा विद्यमान आमदार असतांना भाजप हा मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडणार का? हाच खरा प्रश्‍न आहे.
Devayani and Krishna Patil Dongaonkar Greeting Uddhav Thakrey
Devayani and Krishna Patil Dongaonkar Greeting Uddhav Thakrey

औरंगाबाद : गंगापूर-खुल्ताबाद विधानसभा मतदारसंघातून आतापर्यंत शिवसेनेने तीन वेळा विजय मिळवलेला आहे. 90 मध्ये कैलास पाटील, तर 99 आणि 2004 अशा सलग दोन निवडणुकीत अण्णासाहेब माने या मतदारसंघातून निवडून आले होते. सध्या हा मतदारसंघ भाजपकडे असून प्रशांत बंब हे त्याचे नेतृत्व करतात. युतीमध्ये मतदारसंघ शिवसेनेकडे असला तरी आता जुना 'फॉर्म्युला' मोडीत निघण्याची शक्‍यता आहे.

जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्ष अॅड. देवयानी डोणगांवकर, त्यांचे पती कृष्णापाटील डोणगांवकर हे दोघे पती-पत्नी या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. याशिवाय माजी आमदार अण्णासाहेब माने यांचे चिरंजीव व युवासेनेचे जिल्हाधिकारी संतोष माने हे देखील मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. परंतु, भाजपचा विद्यमान आमदार असतांना भाजप हा मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडणार का? हाच खरा प्रश्‍न आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप युतीने लढणार आणि राज्यातील 20 ते 25 मतदारसंघांची अदलाबदल होणार या चर्चांना सध्या उधाण आले आहे. दोन वर्षापुर्वी कृष्णापाटील डोणगांवकर यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला होता. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडून शिवबंधन बांधून घेतांना त्यांना गंगापूर-खुल्ताबाद विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. शिवसेनेत प्रवेश करताच अॅड. देवयानी डोणगांवकर यांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची लॉटरी लागली.

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत गंगापूरमधून उमेदवारी मिळवण्यासाठी डोणगांवकर पती-पत्नी इच्छुक आहेत. त्यांना पक्षातून माजी आमदार माने यांचे पुत्र संतोष माने यांची स्पर्धा आहे. सोमवारी होणाऱ्या इच्छुकांच्या मुलाखतीमध्ये हे तिघेही उमेदवारीवर दावा सांगणार आहेत.

आमदार बंब निश्चिंत
गंगापूर-खुल्ताबाद मतदारसंघातून आमदार प्रशांत बंब दोनदा निवडून आले आहेत. 2009 मध्ये ते अपक्ष तर 2014 मध्ये भाजपच्या उमेदावरीवर विजयी झाले होते. अपवादात्मक परिस्थीतीत विद्यमान आमदारांच्या मतदारसंघांची अदलाबदल होऊ शकते, असे युतीच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे. परंतु, इथे हा निकष बंब यांच्या बाजुने झुकतो. अपक्ष निवडूण आले तेव्हा देखील बंब भाजपशीस सलंग्न होते, आणि आता ते अधिकृत भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे शिवसेनेने या मतदारसंघाचा आग्रह सोडावा, असे मत भाजप नेत्यांनी व्यक्त केल्याची चर्चा आहे.

कॉंग्रेसचे माजी आमदार अब्दुल सत्तार यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. ते ज्या सिल्लोड-सोयगांव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते तो युतीमध्ये भाजपच्या वाट्याला येतो. परंतु, भाजपने हा मतदारसंघ सत्तार यांच्यासाठी शिवसेनेला सोडला आहे. त्या बदल्यात आता शिवसेना गंगापूरचा मतदारसंघ बंब यांच्यासाठी सोडणार असल्याचे समजते. त्यामुळे गंगापूरमधील शिवसेना इच्छुकांचे कसे पुर्नवसन करणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com