विधानसभेला चिन्ह मित्र पक्षांचे आणि उमेदवार भाजपचेच ! 

भाजपतर्फे मित्र पक्षांकडे त्यांच्या वाट्याच्या जागांवर चांगले म्हणून भाजपला अनुकूल असलेले उमेदवार देण्याचा आग्रह धरला जावू शकतो .
thakrey_Fadanvis
thakrey_Fadanvis

मुंबई :  भाजप- शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या मित्रपक्षांना 18 जागा देण्याचे ठरले असले तरी प्रत्यक्षात विधानसभेला चिन्ह मित्र पक्षांचे आणि उमेदवार भाजपचेच असा प्रकार होण्याची चिन्हे दिसत आहेत . 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे  आमच्या पक्षाच्या माध्यमातून भाजपचे कार्यकर्ते रिंगणात दाखल करणार असल्याची तक्रार मित्रपक्षातील काही नेत्यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उदधव ठाकरे यांना भेटून केली आहे,असे समजते .   

भाजप मित्रांना केवळ दोन दोन जागा देवून प्रत्यक्षात स्वत:साठी मतदारसंघ घेतील अशी भीती सेनेतील काही नेत्यांनी ठाकरे कुटुंबियांकडे बोलून दाखवली आहे असे समजते .   

भाजपतर्फे  मित्र पक्षांकडे  त्यांच्या वाट्याच्या जागांवर चांगले म्हणून भाजपला अनुकूल असलेले उमेदवार देण्याचा आग्रह धरला जावू शकतो . किंवा मित्र पक्षाचे आमदार आपलेसे करून घेण्याचे कौशल्यही भाजप नेत्यांनी चांगले आत्मसात केले आहे असे दिसते . 

याचे उदाहरण म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहुल कुल आणि सदाभाऊ खोत या दोघांच्या बाबतीत काय घडले याचा हवाला दिला जात आहेत . 

राहुल कुल हे पुणे जिल्ह्यातील दौंड विधानसभा मतदारसंघाची आमदार आहेत . ते राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले आहेत . पण ते मुख्यमंत्र्यांच्या इतके जवळ गेलेले आहेत की उद्या पक्षाचा आदेश की मुख्यमंत्र्यांचा शब्द यापैकी एकाची निवड करायची तर ते मुख्यमंत्र्यांच्या शब्दालाच महत्व देतील असे बोलले जाते . कांचन कुल यांनी तर थेट भाजपच्या चिन्हांवरच बारामती मतदारसंघात लोकसभा निवडणूक लढविली होती . 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी  यानी सदाभाऊ खोत यांना मंत्री करायला लावले आणि पुढे सदाभाऊ भाजपच्या इतके जवळ गेले की राजू शेट्टी यांना भाजपशी काडीमोड घ्यावी लागली .  विरोधात गेलेल्या राजू शेट्टी यांच्या पराभवासाठी सदाभाऊ खोत यांनी बरीच मेहनत घेतल्याचे लोकसभा निवडणुकीत दिसले . 

मातोश्रीचा वर्षा तसेच दिल्लीस्थित भाजप हायकमांडशी उत्तम संवाद असल्याने युतीत मिठाचा खडा अदयाप पडू शकलेला नाही. तसेच  लोकसभेला भाजपला नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व यश मिळाले असल्याने आणि भाजपला निवडणूक जिंकण्याचे तंत्र चांगलेच अवगत झालेले असल्याने शिवसेना नेते सध्या संघर्ष टाळण्याच्या बाजूने असल्याचे दिसते .
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com