रणजितसिंह मोहिते पाटील : दोन्ही घरचा पाहुणा उपाशी राहणार?

विजयसिंह मोहिते पाटील हे आपण अद्याप भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगत असतात. दुसरीकडे त्यांचे चिरंजीव हे कधीच भाजपचे झाले आहेत. अशा स्थितीत भाजप त्यांच्या नावाचा पदासाठी विचार करणार का, याकडे आता लक्ष आहे.
रणजितसिंह मोहिते पाटील : दोन्ही घरचा पाहुणा उपाशी राहणार?

पुणे : भारतीय जनता पक्षाच्या वतीने विधान परिषदेवर एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, हर्षवर्धन यांची वर्णी लागण्याची शक्‍यता आहे. मात्र, या चर्चेत रणजीतसिंह मोहिते-पाटील यांच्या नाव घेण्यात येत नाही. सत्ता गेल्याने सत्तेत सामावून घेण्याची पक्षाची क्षमता कमी झाली असली तरी मोहिते-पाटील यांना टाळता येणे पक्षाला शक्‍य होणार आहे का याचीही चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विजयसिंह मोहिते-पाटील यांनी चिरंजीव रणजीतसिंह यांच्यासह पुढच्या पिडीतल्या सर्वांनाच भाजपात पाठवले. मात्र, स्वत: किंवा त्यांच्या बंधूंनी भाजपात अधिकृत प्रवेश केला टाळला. लोकसभा निवडणुकीत माढ्यातून भाजपने विजय खेचून आणला. विधानसभा निवडणुकीतही माळशिरसमधून मोठ्या अटीतटीच्या लढतीत राम सातपुते यांच्या विजयात त्यांचा मोलाचा वाटा होता.

राज्यात भाजपची सत्ता येईल, असे वाटत असताना सत्ता गेली.महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले. आत विधान परिषद निवडणुकीची चर्चा सुरू झाली. मात्र, या चर्चेत विजयसिंह मोहिते पाटील किंवा रणजीतसिंह मोहिते-पाटील यांचे नाव चर्चेत येईना. भाजपाच्या मूळ संघटनेतील अनेकांना आमदारकी देणे पक्षाला क्रमप्राप्त असल्याने या स्पर्धेत मोहिते-पाटलांचे नाव मागे पडले असावे, असे सांगण्यात येत आहे. एकनाथ खडसे यांना उमेदवारी देणे शक्‍य असताना विधानसभा निवडणुकीत त्यांच्या मुलीला उमेदवारी देण्यात आली. तावडे, बावनकुळे यांनाही टाळण्यात आले. पंकजा मुंडे यांना निवडणुकीत अपयश आल्याने या साऱ्या नव्हे तरी यातील काही जणांना तरी विधान परिषदेवर संधी द्यावी लागणार आहे. यात खडसे, मुंडे यांची नावे आघाडीवर आहेत. या पार्श्‍वभूमीवर शरद पवार यांचा विरोध पत्करून भाजपात प्रवेश केलेल्या मोहिते-पाटील यांच्या हाती काहीच लागलेले नाही.

मोहिते पाटील यांनी भाजपला काॅंग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक मोहरे मिळवून देण्यात मदत केली. भाजपचे सरकार आले असते तर रणजितसिंह यांना मोठी संधी मिळाली असती. तसे आश्वासनही भाजपने दिले होते. मात्र राज्यातील सत्तेचे चित्र बदलल्यानंतर मोहिते पाटलांचे नाव चर्चेतही येईनासे झाले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com