शिवसेनेच्या महापौरपदाच्या मनसुब्यांना 'मनसे' लावणार सुरुंग?

महापौर पदांच्या राजकीय घडामोडी रोज नवी वळणे घेत आहेत. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहरातील राजगड या कार्यालयात मनसेचे गटनेते सलीम शेख यांनी भाजपचे महापालिका स्थायी समिती सभापती उध्दव निमसे आणि नगरसेवक शिवाजी गांगुर्डे यांच्यासमवेत बैठक घेतली. यात महापौर निवडणुकीविषयी चर्चा केल्याचे समजते.
MNS To Play Major Role in Nashik Mayor Election
MNS To Play Major Role in Nashik Mayor Election

नाशिक : नाशिक महापालिकेत महाशिव आघाडीच्या रुपाने भाजपला धक्का देण्याचा शिवसेनेचा मनसुबा आहे. मात्र, आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून भाजप नेत्यांसमवेत बैठक घेऊन सुरुंग लावण्याची तयारी सुरु झाली आहे.

महापौर पदांच्या राजकीय घडामोडी रोज नवी वळणे घेत आहेत. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहरातील राजगड या कार्यालयात मनसेचे गटनेते सलीम शेख यांनी भाजपचे महापालिका स्थायी समिती सभापती उध्दव निमसे आणि नगरसेवक शिवाजी गांगुर्डे यांच्यासमवेत बैठक घेतली. यात महापौर निवडणुकीविषयी चर्चा केल्याचे समजते. श्री. निमसे यांनी मात्र ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले.

महापालिकेत भाजपकडे ६५ नगरसेवक आहेत. मात्र माजी शहराध्यक्ष, माजी आमदार बाळासाहेब सानप सध्या भाजप सोडून शिवसेनावासी झाले आहेत. त्यांचा काही नगरसेवकांशी  चांगला संपर्क आहे. त्यामुळे भाजपच्या परगावी गेलेल्या नगरसेवकांतले आठ ते दहा नगरसेवक संपर्काच्या बाहेर आहेत. त्यामुळे भाजप नेते चिंतातुर आहेत. भाजपला महापालिकेत शह देण्यासाठी शिवसेनेने राज्यात सुरु असलेला महाशिव आघाडीचा प्रयोग नाशिकमध्ये करण्याचा चंग बांधला आहे. त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व त्यांच्याशी संबंधित १९ आणि शिवसेनेचे ३५ असे ५४ संख्याबळाचे गणित आहे. 

यामध्ये मनसे सहभागी झाल्याशिवाय शिवसेनेचे  सत्तेचे गणित जुळवणे अवघड आहे. त्यामुळे गेले दोन दिवस शिवसेनेकडून मनसेशी संपर्काचे प्रयत्न सुरू होते. मात्र, मनसेच्या नेत्यांनी पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्याकडे बोट करीत त्याला पूर्णविराम दिला होता. आता मात्र भाजपशी चर्चा करून त्यांनी महापालिकेतील सर्व भाजप विरोधकांना धक्का दिला आहे. भाजपकडून मनसेला उपमहापौर पदाची ऑफर देण्याचा विचार आहे, असेही कळते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com