Will BJP allow entry to Suresh Dhas ? | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

साताऱ्यात गुरूवारी मध्यरात्रीपासून सात दिवस कडक लॉकडाउन करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरित सर्वकाही बंद राहणार आहे.

सुरेश धस यांना भाजपचे दार कधी उघडणार ?

सरकारनामा ब्युरो
रविवार, 30 एप्रिल 2017

धस समर्थक हवालदिल झाले आहेत.आपल्या नेत्याचे व्यर्थ ना हो बलिदान अशी समर्थकांची भावना आहे . राष्ट्रवादी काँग्रेस मधून निलंबित झाल्याने परतीचे दोर कापले गेले आहेत . आता भाजपने बरोबर घेतले नाही तर दोन्ही घरचा पाहून उपाशी अशी श्री. धस यांची अवस्था झाली आहे .  नेताच वाऱ्यावर असेल तर आपले काय होणार? या चिंतेने  कार्यकर्त्यांना त्यांना ग्रासले आहे

बीड: जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला उघडपणे मदत करत बीडच्या राजकारणात भूकंप आणणारे राष्ट्रवादीतील निलंबित नेते व माजी राज्यमंत्री सुरेश धस यांच्या  भाजप प्रवेशाला कधी मुहूर्त लागणार याची कार्यकर्त्यात चर्चा सुरु झाली आहे . भाजपचे पक्षश्रेष्ठी धस यांच्या साठी पक्षाचे प्रवेशद्वार कधी उघडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे . 

सुरेश धस "कोणत्या पक्षात जाऊ' अशी विचारणा जिल्ह्यातील गावागावात जाऊन करीत आहेत. महिनाभरापासून सुरु असलेलीत्यांची संवाद मोहिम काही केल्या संपत नसल्याने नेमक सुरेश धस यांच्याडोक्‍यात काय चाललंय याचा नेमका अंदाज येतांना दिसत नाहीये.

राष्ट्रवादीने सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केल्याने धस यांना दुसऱ्या राजकीय पक्षाचा आधार घ्यावा लागणार आहे. जिल्हा परिषद निवडणुकीतत्यांनी उघडपणे भाजपला पाठिंबा दिल्याने त्यांचा भाजप प्रवेश निश्‍चित मानला जात होता. त्यासाठी धस यांनी अक्षय तृतीयेचा मुर्हूत शोधल्याची चर्चा जिल्ह्यामद्ये होती.

पण हा मुर्हूत देखील हुकल्याने धस समर्थक हवालदिल झाले आहेत.आपल्या नेत्याचे व्यर्थ ना हो बलिदान अशी समर्थकांची भावना आहे . राष्ट्रवादी काँग्रेस मधून निलंबित झाल्याने परतीचे दोर कापले गेले आहेत . आता भाजपने बरोबर घेतले नाही तर दोन्ही घरचा पाहून उपाशी अशी श्री. धस यांची अवस्था झाली आहे .  नेताच वाऱ्यावर असेल तर आपले काय होणार? या चिंतेने  कार्यकर्त्यांना त्यांना ग्रासले आहे. तर तिकडे धस मात्र अजून आपली संवाद मोहिम सुरुअसल्याचे सांगतात. 

तलवारी म्यान

धस यांच्यावर पक्षाने निलंबनाची कारवाई केल्यानंतर धस विरूध्द पंडीत,सोळंके असा सामना रंगला होता. एकमेकांवर खालच्या स्तरावर जाऊन आरोप
केल्याने धस यांनी पंडीत व सोळंके यांच्या विरोधात आष्टी पोलीस ठाण्यातबदनामी केल्याप्रकरणी तक्रार दाखल गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले होते.
त्यानंतर दोन्ही बाजूने तलवारी म्यान करण्यात आल्याचे दिसते.

धनंजय मुंडे यांचेही मौन

पंडीत, सोळंके यांच्या बाबतीत काहीसे मवाळ झालेले धस आपल्या संवाद मोहिमेतून धनंजय मुंडे यांच्यावर मात्र चांगलेच तोंडसुख घेतांना
दिसतायेत. मुंडे यांनी धस यांच्यावर "गद्दारी त्यांच्या रक्तातच आहे' हा केलेला आरोप त्यांच्या चांगल्याच जिव्हारी लागला होता. तेव्हा पासून संधी मिळेल तेव्हा धस मुंडे यांच्यावर निशाणा साधत आहेत. विशेष म्हणजे आक्रमक
नेतृत्वासाठी ओळखल्या जाणाऱ्या धनंजय मुंडे यांनी मात्र धस यांच्या टिकेला उत्तर द्यायचे नाही अशी भूमिका घेतल्याचे आतापर्यंत दिसून आले. धस
यांच्या टिकेकडे फारसे लक्ष द्यायचे नाही असा पावित्रा मुंडे यांनी घेतल्याचे त्यांचे समर्थक बोलतात.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख