शिरुरमध्ये शिवसेना-भाजपचे मनोमिलन झाले, मावळमध्ये कधी होणार?

पुणे जिल्ह्यात युतीधर्मापासून अद्याप दूर असलेल्या भाजप आमदार आणि पदाधिकाऱ्यांची शाळा आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी (ता.२) पुण्यात घेणार आहेत.
शिरुरमध्ये शिवसेना-भाजपचे मनोमिलन झाले, मावळमध्ये कधी होणार?

पिंपरी: पुणे जिल्ह्यात युतीधर्मापासून अद्याप दूर असलेल्या भाजप आमदार आणि पदाधिकाऱ्यांची शाळा आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी (ता.२) पुण्यात घेणार आहेत. त्याची कुणकुण लागल्याने शिवसेना उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारापासून अलिप्त राहिलेल्या भोसरीच्या आमदार महेशदादा लांडगे समर्थक कार्यकर्त्यांनी आढळरावांच्या प्रचारार्थ विजयी संकल्प मेळाव्याचे बुधवारी (ता.३) आयोजन केले आहे.

बारामती आणि पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार हे २ तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. हे निमित्त साधून मुख्यमंत्री पुण्यात येत आहेत. यावेळी ते पुणे जिल्ह्यातील पक्षाचे खासदार, आमदार, पदाधिकाऱ्यांची शाळा घेणार आहेत, असे भाजपच्या पदाधिकाऱ्याने सांगितले. त्यात ते मावळ आणि शिरुरमधील शिवसेनेचे उमेदवार अनुक्रमे श्रीरंग बारणे व आढळराव यांच्या प्रचारात दूर असलेल्या पक्ष पदाधिकारी व आमदारांना डोस देण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याअगोदरच मनोमिलनाच्या हालचाली वाढल्या आहेत. भोसरीत बुधवारी होणाऱ्या मेळाव्याने त्याला दुजोरा मिळाला आहे. 

नमूद करण्याजोगी बाब म्हणजे या मेळावा आयोजकांतील दोन ज्येष्ठ भाजप नगरसेवकांनीच नुकताच आढळरावविरोधी सुर लावला होता. भोसरीतील विकासकामांच्या तक्रारी करून त्यात अडथळा आणणारे आढळराव यांच्यासाठी मते कशी मागायची अशी विचारणा त्यांनी लांडगे यांनी बोलावलेल्या बैठकीत केली होती. आता  नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आढळराव यांना मतदान करून त्यांना निवडून द्या, असे आवाहन करण्याची पाळी त्यांच्यावरच आली आहे. 

शिवसेना, भाजप युती झाल्यानंतर आढळराव यांनी टाळीसाठी हात पुढे करताच लांडगे यांनी आपल्या या कट्टर राजकीय शत्रूच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला होता. नंतर ते स्वतः शनिवारी प्रचारातही सामील झाले होते. मात्र, त्यांचे समर्थक चार हात दूरच होते.ते आता सामील होत आहेत. मात्र, मावळ लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या शहरातील पिंपरी व चिंचवड या विधानसभेच्या मतदारसंघात भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यांना प्रचारात सामील होण्याचा आदेश अजून आलेला नाही. तो मंगळवारी मिळण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com