धुळे कॉंग्रेसचे उमेदवार शेवाळे की पाटील? किंगमेकर मात्र अमरीशभाई?

धुळे लोकसभा मतदारसंघांसाठी प्रदेश कॉंग्रेसतर्फे जिल्हा अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे आणि माजी मंत्री रोहिदास पाटील यांची शिफारस करण्यात आली आहे. पॅनेलची शिफारस केल्याने दोन्ही इच्छुकांकडून आज मुंबई आणि दिल्लीत जोरदार लॉंबींग सुरु करण्यात आले. गेल्या दोन निवडणुकांत उमेदवारी केलेले अमरीश पटेल यांना अनुकुल वातावरण होते. त्यात रोहिदास पाटील यांनी उघडपणे पक्षविरोधी भूमिका घेत पटेल यांना विरोध केला होता. त्यामुळे आपल्या पराभवाची परतफेड करण्यास आतुर असलेले पटेल उमेदवारी आणि निवडणुकीचा निकाल दोन्हींमध्ये किंगमेकर ठरण्याची चिन्हे आहेत.
Tushar Shewale - Amrish Patel - Rohidas Patil
Tushar Shewale - Amrish Patel - Rohidas Patil

मालेगाव : धुळे लोकसभा मतदारसंघांसाठी प्रदेश कॉंग्रेसतर्फे जिल्हा अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे आणि माजी मंत्री रोहिदास पाटील यांची शिफारस करण्यात आली आहे. पॅनेलची शिफारस केल्याने दोन्ही इच्छुकांकडून आज मुंबई आणि दिल्लीत जोरदार लॉंबींग सुरु करण्यात आले. गेल्या दोन निवडणुकांत उमेदवारी केलेले अमरीश पटेल यांना अनुकुल वातावरण होते. त्यात रोहिदास पाटील यांनी उघडपणे पक्षविरोधी भूमिका घेत पटेल यांना विरोध केला होता. त्यामुळे आपल्या पराभवाची परतफेड करण्यास आतुर असलेले पटेल उमेदवारी आणि निवडणुकीचा निकाल दोन्हींमध्ये किंगमेकर ठरण्याची चिन्हे आहेत.

दीर्घकाळ काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या या मतदारसंघात हेवीवेट नेत्यांच्या उमेदवारीच्या मागणीने जोरदार लॉबींग सुरु झाले आहे. यामध्ये डॉ. शेवाळे यांच्या नावाला प्रदेश अध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण अनुकुल असल्याचे बोलले जाते. डॉ. शेवाळे चव्हाण यांचे फेव्हरेट असल्याची चर्चा आहे. मात्र, माजी मंत्री पाटील यांचा वरिष्ठ स्तरावरील संबंधामुळे आता उमेदवारीसाठी स्पर्धा आहे. हे नेते त्यासाठी मुंबई, दिल्लीत सक्रीय आहेत. मतदारसंघात धुळे शहर, धुळे बाह्य, शिंदखेडा तसेच नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहर, मालेगाव बाह्य, बागलाण या मतदारसंघांचा समावेष आहे. नाशिक जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघात कॉंग्रेसला अनुकुल वातावरण आहे. त्यामुळे उमेदवारी कोणाला मिळते यावर राजकीय समीकरणे बदलु शकतात.

धुळे मतदारसंघात केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे 2014 मध्ये कॉंग्रेसला राम राम करुन भाजपमध्ये दाखल होत त्यांच्या खास 'गुजरात' कनेक्‍शनमुळे खासदार व लगोलग राज्यमंत्री झाले. 'मोदी' लाटेपेक्षाही त्यांच्या विजयाचे श्रेय कॉंग्रेसमधील गटबाजीला जाते. कॉंग्रेसची उमेदवारी अमरीशभाई पटेल यांना जाहिर झाली होती. त्यावर मालेगाव शहरात अपूर्व हिरे यांनी उघडपणे विरोध करीत पटेल यांचा पुतळा जाळला होता. तर माजी मंत्री राहिदास पाटील उघडपणे पक्षविरोधी भूमिका घेतली. या निवडणुकीत भाजपचे डॉ. भामरे यांना 5,29,450 तर कॉंग्रेसचे अमरीश पटेल यांना ३,९८,७२७ मते मिळाली होती. पटेल यांचा हा सलग दुसरा पराभव असल्याने तो त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. त्याचा वचपा काढण्यासाठी रोहिदास पाटील यांना उमेदवारी मिळाल्यास पटेल यांच्यासाठी आगामी निवडणुक उत्तम संधी असेल.

धुळे मतदारसंघासाठी दोन नावांचे पॅनेल सुचविण्यात आले आहे. त्यात माझ्याही नावाचा समावेश आहे. मतदारसंघातील राजकीय स्थिती व अनुकुलता लक्षात घेता पक्ष योग्य उमेदवाराची विचार करील असा माझा विश्‍वास आहे - डॉ. तुषार शेवाळे, अध्यक्ष, नाशिक जिल्हा कॉंग्रेस.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com