अमित देशमुखांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ? प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात शब्द पाळणार का?

आमदार अमित देशमुख दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे ज्येष्ठ चिरंजीव आहेत. लातूर शहर मतदारसंघातून श्री. देशमुख यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत विजयाची हटट्रीक साधली आहे.
Will Balasaheb Thorat Keep Word to Give Ministry to Congress MLA Amit Deshmukh
Will Balasaheb Thorat Keep Word to Give Ministry to Congress MLA Amit Deshmukh

लातूर :  राज्यात आता शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या  महाविकास आघाडीची सरकार येत आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये लातूरचे माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांना कॅबिनेट दर्जाचे मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ तसा शब्दही लातूरकरांना दिला आहे. आता ते लातूरकरांना दिलेला शब्द पाळणार का? याकडे लक्ष लागले आहे.

आमदार अमित देशमुख दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे ज्येष्ठ चिरंजीव आहेत. लातूर शहर मतदारसंघातून श्री. देशमुख यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत विजयाची हटट्रीक साधली आहे. २०१२ मध्ये विलासराव देशमुख यांचे निधन झाल्यानंतर श्री. देशमुख यांना पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारमध्ये शेवटचे अडीच ते तीन महिन्याचे राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर राज्यात भारतीय जनता पक्ष व शिवसेनेची सत्ता आली. 

नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर गेली महिनाभर सत्तेचे नाटय पहायला मिळाले. अखेर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा महाविकास आघाडीचे सरकार येत आहे. सध्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व विधीमंडळाचे गटनेते पद बाळासाहेब थोरात यांच्याकडे आहे. श्री. थोरात हे दिवंगत विलासराव देशमुख यांचे विश्वासू सहकारी होते. राज्यात श्री. थोरात यांना लिफ्ट देण्याचे काम विलासरावांनी केले. इतकेच नव्हे तर मुख्यमंत्री पदाच्या कालावधीत श्री. थोरात यांना लातूरचे पालकमंत्रीही केले होते. त्यामुळे देशमुख कुटुंबिय व थोरात यांचे चांगले संबंध आहेत. 

निवडणुकीत श्री. अमित देशमुख यांच्या प्रचारार्थ श्री. थोरात यांनी येथे काही सभा घेतल्या. इतकेच नव्हे तर राज्यात आघाडीचे सरकार आले तर अमित देशमुख हे मुख्यमंत्री असतील अशी घोषणाही त्यांनी केली होती.  आता राज्यातील शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली येत असलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये काँग्रेस आहे. त्याचे सर्वेसर्वा श्री. थोरात आहेत. त्यामुळे श्री. देशमुख यांना कॅबिनेट मंत्री करून श्री. थोरात शब्द पाळतील अशी आशा लातूरकरांना आहे. श्री. देशमुख मंत्री होणार का याकडे आता लक्ष लागले
आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com