Akola ZP May Experience MahashivAghadi Expriment
Akola ZP May Experience MahashivAghadi Expriment

महाशिवआघाडी अकोला जिल्हा परिषदेतही?  

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्ता स्थापनेसाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महाशिवआघाडी स्थापन झाली आहे. या नव्या आघाडीचा प्रयोग आगामी अकोला जिल्हा परिषद निवडणुकीतही राबविला जाण्याची शक्यता आहे. त्या संदर्भातील संकेत काँग्रेसच्या गोटातून देण्यात आले आहेत.

अकोला : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्ता स्थापनेसाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महाशिवआघाडी स्थापन झाली आहे. या नव्या आघाडीचा प्रयोग आगामी अकोला जिल्हा परिषद निवडणुकीतही राबविला जाण्याची शक्यता आहे. त्या संदर्भातील संकेत काँग्रेसच्या गोटातून देण्यात आले आहेत. याशिवाय जिल्ह्यातील काँग्रेसच्या संघटनात्मक बळकटीसाठी लवकरच प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात अकोला जिल्हा दौरा करणार आहेत. काँग्रेसची जिल्ह्यातील स्थिती सुधारावी म्हणून जिल्ह्यात ते स्वतः लक्ष घालणार आहेत.

मुंबईत शुक्रवारी प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन, दादर येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली अकोला, वाशीम, धुळे, नंदूरबार आणि नागपूर या जिल्ह्यातील काँग्रेस नेते व पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीला प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसेन, प्रदेश सरचिटणीस मोहन जोशी, प्रकाश सोनावणे, अभिजीत सपकाळ, विनायक देशमुख आदी उपस्थित होते. अकोला जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल या बैठकीला अनुपस्थित राहिले. युवक काँग्रेसतर्फे महेश गणगणे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत जिल्ह्यातील काँग्रेसच्या स्थितीबाबत वरिष्ठांना माहिती दिली. 

काँग्रेसची अकोला जिल्ह्यात वाताहत होत आहे. त्याची कारणे शोधून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी व ग्रासरुटवर कार्यकर्त्यांची फौज निर्माण करण्यासाठी स्वतः प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात अकोला जिल्ह्यात लक्ष घालणार आहे. त्यासाठी ते पुढील आठवड्यात अकोला जिल्ह्याचा दौरा करण्याची शक्यता आहे. बैठकीला उपस्थित अकोला जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करताना त्यांनी याबाबत माहिती दिल्याचे समजते. त्यावेळी जिल्हा काँग्रेसमध्ये लवकरच संघटनात्मक बदलाबाबत पावले उचलण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यासोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेसची सदस्य संख्या वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहे. 

राज्यातील नव्या राजकीय समीकरणाचे पडसाद आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही पडण्याची शक्यता आहे. त्याची सुरुवात पाच जिल्ह्यातील परिषद निवडणुकीपासून होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. महाशिवआघाडीचा प्रयोग राज्यात सर्वंच निवडणुकांमध्ये राबविण्याच्या निर्णयाबाबत चर्चा सुरू आहे. तसे झाल्यास अकोला जिल्हा परिषदेसह राज्यातील पाच जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढवू शकत, असे संकेत काँग्रेसच्या गोटातून मिळत आहेत.  

‘वंचित’ला रोखण्यासाठी प्रयत्न
अकोला जिल्हा हा ॲड. प्रकाश आंबेडकर यांची कर्मभूमी मानली जाते. वंचित बहुजन आघाडीची सर्वाधिक ताकद या जिल्ह्यातच आहे. त्यामुळे अकोल्यातच वंचित बहुजन आघाडीला रोखण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करणार आहे. त्याकरिता प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे स्वतः अकोला जिल्ह्यात लक्ष घालणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com