राष्ट्रवादीत संग्राम कोते यांची जागा कोकणातील अजित यशवंतराव घेणार? - will ajit yashwantrao get opportunity? | Politics Marathi News - Sarkarnama

राष्ट्रवादीत संग्राम कोते यांची जागा कोकणातील अजित यशवंतराव घेणार?

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 8 फेब्रुवारी 2019

मुंबई : परिवर्तन यात्रेदरम्यान राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी अनेक युवानेत्यांची नावे चर्चेत असताना कोकणातील अजित यशवंतराव यांचे नाव आघाडीवर असल्याचे सांगितले जात आहे. सध्या यशवंतराव राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या चिटणीसपदी कार्यरत आहेत.

युवकचे माजी प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांच्या कार्यकाळात उपाध्यक्ष म्हणून युवक राष्ट्रवादीचे काम त्यांनी पाहिले होते. तसेच, निरंजन डावखरे यांच्या अध्यक्षतेखाली उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले तसेच, कोकणातील युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विचारधारेशी जोडण्याचे काम अजित यशवंतराव यांनी केले. 

युवक संघटनेतील त्यांच्या कार्याची दखल घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसने 2014 साली झालेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. कोकणातील स्थानिकांच्या अस्मितेचा प्रश्न बनलेल्या नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधात आवाज उठवून राष्ट्रवादी कॉंग्रेसची भूमिका मांडण्याचे काम यशवंतराव यांनी आपल्या नेतृत्वाखाली करून दाखवले आहे.

लोकसभा व विधानसभेच्या 2019 च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन 2012 पासून राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस मध्ये कार्यरत असलेल्या अनुभवी तसेच  सामान्य कुटुंबातून आलेल्या व्यक्तीला राष्ट्रवादी कॉंग्रेस कडून संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. परंतु, नूतन प्रदेशाध्यक्ष कोण होणार? राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कोणाला संधी देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख