अजित पवार पूल पाडण्याआधी याचा विचार करतील का?

....
अजित पवार पूल पाडण्याआधी याचा विचार करतील का?

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील काही पूल पाडण्याचे मत व्यक्त केल्यानंतर त्याविषयी चर्चा सुरू झाली आहे. ज्यांनी हे चुकीचे पूल बांधले, त्यांच्यावर कारवाई करावी आणि अभ्यास करूनच योग्य तो निर्णय घ्यावा, असे आवाहन भाजपच्या दोन माजी नगरसेवकांनी केली आहे.

पुणे विद्यापीठ चौकातील पूल पाडण्याचे सूतोवाच अजित पवार यांनी केले होते. त्यानंतर या विषयाचे विविध कंगोरे पुढे येते आहेत.

माजी नगरसेवक उज्जव केसकर आणि सुहास कुलकर्णी यांनी याबाबत निवेदन प्रसिद्धिस दिले आहेत. या निवेदनात म्हटले आहे की आपण स्पष्टवक्ते आहात. कार्यक्षम देखील आहात. पुण्यात मतमतांतरे होतात असेही सांगितले.
भोसरी येथे केंद्रीय रस्ते वाहतूक संशोधन संस्था (CIRT) आहे. त्यांच्याकडून काही यावर मार्ग काढता येतो का? त्यांचे मत घ्यायला हवे असे आम्हाला वाटते. हे उड्डाणपूल रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) वतीने बांधले होते. त्यांच्याही सल्लागाराचे मत मागवावे. मगच या उड्डाणपूल पाडून नवीन बांधण्याचा निर्णय घेण्यात यावा. एकदा हे उड्डाणपूल पाडण्याचा निर्णय झाला की जे संबंधित अधिकारी,सल्लागार असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. हा सार्वजनिक निधीचा अपव्यय आहे आम्ही देखील या विषयातील जाणकार पुणेकर नागरिक यांच्या कडून एक अहवाल तयार करून सादर करू. आमची विनंती घाईघाईने उड्डाणपूल तोडण्याचा निर्णय घेऊ नये, असेही या दोघांनी म्हटले आहे.

पुण्यातील चुकीच्या पद्धतीने उभारलेले जुने उड्डाणपूल पाडून त्याठिकाणी पुरेशा क्षमतेचे नवे पूल बांधण्याचा नियोजन असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले असले तरी; नवे पूल उभारण्याची योजना तुर्तास तरी नसल्याचे महापालिका प्रशासन आणि पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) स्पष्ट केले. त्यामुळे नेमके पूल पाडणार आणि नव्या पुलांची योजना काय आहे असेल ? याचा संभ्रम निर्माण झाला आहे. नियोजनानुसार मेट्रो प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पुलांची पुर्नरचना करणे आवश्‍यक असून, त्यामुळे भविष्यातील वाहतूक कोंडी सोडविणे शक्‍य होणार आहे, असे पवार यांनी "ट्विट' मध्ये म्हटले होते.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलांची बांधणी चुकल्याचे सांगत, त्याबाबत काही तरी निर्णय घ्यावा लागणार आहे, असे पवार यांनी शनिवारी एका कार्यक्रमात जाहीर केले. त्याआधी पुणे-सोलापूर रस्त्यावरील (हडपसर) पुलाची रचना चुकल्याबाबत पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्‍वभूमीवर पुणे शहर आणि उपनगरांमधील काही पुलांची रचना चुकल्याने ती पाडून अधिक क्षमतेचे पूल बांधण्याची गरज पवार यांनी आपल्या "ट्विट'मधून व्यक्त केली आहे. त्यानंतर कोणते पूल पाडावे लागतील, चुकीची नेमकी कारणे, पाडायची असतील नवे पूल कोण बांधणार आणि त्यासाठीचा खर्च याची कल्पना नसल्याचे महापालिकेच्या प्रकल्प खात्यातर्फे सांगण्यात आले आहे. "पीएमपीआरडीए'ला फारशी माहिती नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, वनाझ ते रामवाडी, पिंपरी ते स्वारगेट आणि शिवाजीनगर ते हिंजवडी या नियोजित मेट्रो मार्गांवरील काही पुलांची रचना बदलले जाऊ शकते, इतकाच खुलासा महापालिका आणि पीएमआरडीए करीत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com