कोरोना ; जीवाच्या भितीने माणसे घरांत, अन वन्यप्राणी गावात

कोरोनाच्या भीतीने जग हादरले आहे, रस्ते सुनसान झालेत. उद्योग व व्यवसाय बंद झाले. जीवाच्या भितीने नागरिक घरांत बसले आहेत. परीणामी प्रदुषण कमी झाले. यामुळेच की काय वन्यप्राणी मुक्त भटकंती करताना दिसताहेत
Wild Animals Wandering Freely in Lock Down
Wild Animals Wandering Freely in Lock Down

नागपूर : कोरोनाच्या भीतीने जग हादरले आहे, रस्ते सुनसान झालेत. उद्योग व व्यवसाय बंद झाले. जीवाच्या भितीने नागरिक घरांत बसले आहेत. परीणामी प्रदुषण कमी झाले. यामुळेच की काय वन्यप्राणी मुक्त भटकंती करताना दिसताहेत. मुंबईच्या समुद्रात मरीन लाईनजवळ डॉल्फिनचे दर्शन झाले, तामिळनाडूमध्ये शहरात नीलगाय आली. आणि शहरालगतच्या हिंगणा वनपरिक्षेत्रातील उमरी वाघ या गावात सकाळी एक नर नीलगाय बसून असलेली दिसली.  

शहरात आणि लगतच्या परीसरात माणसांचा वावर कमी झाल्याने वन्यप्राणी निर्धास्त फीरताना आढळत आहेत. उमरी वाघ या गावात आलेल्या नीलगायीला वनकर्मचार्यांनी पळवायचा प्रयत्न केला, पण ती जात नव्हती. लाख प्रयत्न करुनही काही केल्या ती गेली नाही.  त्यामुळे ट्रान्झीस्ट ट्रीटमेंट सेंटरच्या चमुला प्राचारण करण्यात आले. चमूने तिला बेशुद्ध करुन तपासणी केली. तातडीने तिला तिच्या अधिवासात सोडण्यात आले. 

यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी ग. ना. जाधव यांच्या नेतृत्वात डॉ सय्यद बिलाल, डॉ मयूर काटे, पशु पर्यवेक्षक समीर नेवारे, सिद्धार्थ मोरे, वनपाल, सचिन ताकसांडे, वनरक्षक मिलिंद वनकर, वनमजुर रविंद्र मिटकरी, कमलेश गेडाम, राजेश खांडेकर यांनी हे काम केले. नीलगायीला बेशुद्ध करून पूर्ण वैद्यकीय तपासणी करून तिला परत जंगलात म्हणजे मूळ अधिवासात निसर्गमुक्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com