उद्धव मुख्यमंत्री-अजित पवार उपमुख्यमंत्री? शिवमहाआघाडीचा फाॅर्म्युला? - Wiil Shivsena Uddhav Thakrey Be CM and NCP Ajit Pawar Deputy CM | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

उद्धव मुख्यमंत्री-अजित पवार उपमुख्यमंत्री? शिवमहाआघाडीचा फाॅर्म्युला?

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

राज्यात शिवसेना आणि भाजप यांच्यातला काडीमोड स्पष्ट झाल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या मदतीने सरकार स्थापन करण्याच्या हालचाली शिवसेनेने सुरु  केल्या आहेत. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तसेच काँग्रेस नेत्यांशी दूरध्वनीवरुन चर्चा झाल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार शिवमहाआघाडीचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांनी करुन मुख्यमंत्री पद घ्यावे तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद व जयंत पाटील यांना गृहमंत्रीपद देण्याबाबत विचार सुरु आहे. 

मुंबई : राज्यात शिवसेना आणि भाजप यांच्यातला काडीमोड स्पष्ट झाल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या मदतीने सरकार स्थापन करण्याच्या हालचाली शिवसेनेने सुरु  केल्या आहेत. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तसेच काँग्रेस नेत्यांशी दूरध्वनीवरुन चर्चा झाल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार शिवमहाआघाडीचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांनी करुन मुख्यमंत्री पद घ्यावे तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद व जयंत पाटील यांना गृहमंत्रीपद देण्याबाबत विचार सुरु आहे. 

दिल्लीत काँग्रेसची बैठक दहा वाजता होणार असून शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देण्याऐवजी सत्तेत सहभागी व्हावे का यावर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. तसे झाले तर काँग्रेसला विधानपरिषदेचे अध्यक्षपद देण्याचाही विचार सुरु असल्याचे समजते. 

सेनेचे केंद्रातील मंत्री अरविंद सावंत आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देत आहेत. तर दुसरीकडे महायुतीतून बाहेर पडण्याची तयारी शिवसेनेने चालवली आहे. राज्यात काँग्रेस- राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापनेच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. 

काल सायंकाळी भाजपने आपण सरकार स्थापन करु शकत नसल्याचे राज्यपालांना कळवले. त्यानंतर आता राज्यात सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. मुख्यमंत्रीपद आणि ५० -५० टक्के मंत्रीपदे यावरुन शिवसेना -भाजपमध्ये संघर्ष सुरु होता. शिवसेना मुख्यमंत्रीपदावर ठाम होती. अखेर काल सायंकाळी भाजपने शिवसेनेच्या हातात दिलेला आपला हात काढून घेतला. भाजप सरकार स्थापन करु शकत नाही, असे भाजपने राज्यपालांना कळवले. 

शिवसेनेकडे ५६ आमदारांचे बळ आहे. तर महाआघाडीकडे १०५ आमदारांचे बळ आहे. त्यामुळे दोन्ही तिन्ही पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करु शकतात. राज्यपालांनी शिवसेनेला सायंकाळी साडेसात वाजेपर्यंतची मुदत सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी दिली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख