मते मागताना लाज कशी वाटत नाही : शरद पवार यांचा राहुल कुल यांना सवाल

मते मागताना लाज कशी वाटत नाही : शरद पवार यांचा राहुल कुल यांना सवाल

वरवंड : भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याची सध्याची परीस्थीती पाहून मला  झोप येत नाही, अशी अवस्था वर्णन करत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दौंडवासियांपुढे आपली चिंता व्यक्त केली.

ज्यांच्या हातात कारखान्याचा कारभार आहे. त्यांनी सभासदांना उसाचा बाजारभाव दिला नाही. कामगारांचे पगार थकविले. सरकारकडुन घेतलेले पैसे काय केले याचा पत्ता नाही. मग ज्या व्यक्तीने तालुक्याची व्यवस्था बिघडवली अशा व्यक्तीला लोकांमध्ये जावुन मताचा जोगवा मागताना लाज कशी वाटत नाही, असा सवाल त्यांनी केला.

अशांना त्यांची जागा दाखवून द्या, अशी टीका त्यांनी महायुतीचे उमेदवार राहुल कुल यांचे नाव न घेता केली. राष्ट्रवादीचे काॅंग्रेसचे महाआघाडीचे उमेदवार रमेश थोरात यांच्या प्रचारार्थ वरवंड (ता.दौंड) येथील आयोजित सभेत पवार बोलत होते.

पवार म्हणाले, ``भाजपच्या हातात सत्ता गेली याचे परीणाम सगळे भोगत आहेत. महाराष्ट्र ज्यांच्या हातात आहे. त्यांच्या हातातुन काढुन घ्यायचा आहे. राज्यात शेती व्यवस्था कोलमडुन पडली आहे. शेतमालाला बाजारभाव नसल्याने राज्यात सोळा हजार शेतकऱयांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली. मात्र,सरकारने धनदांगडयांनी थकविलेले कोटयावधी रुपये भरुन त्यांना वाचविण्याचे काम केले. आमच्या काळात आम्ही शेतकऱयांची सरसकट कर्जमाफी केली.`` 

``महाराष्ट्रात नंबर एकची पुणे जिल्हा बॅंक आहे. रमेश थोरात यांनी हे ती बॅंक चालवीत आहेत. दौंड तालुका हा जिल्ह्यातील महत्वाचा तालुका आहे. आम्ही आमच्या काळात राज्यात अनेक ठिकाणी धरणे बांधली. बारामतीपेक्षा दौंडचे ओलिताखालचे क्षेत्र आहे. मी अनेक  कंपन्या या ठिकाणी आणल्या,``असे त्यांनी सांगितले.

समोरील उमेदवाराने तालुक्याची व्यवस्था बिघडवली आहे. त्यामुळे सभेतील गर्दी व उत्साहा पाहता यावेळी मागील विधानसभा निवडणुकीची नक्की भरपाई निघणार असल्याचा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला.

 सुप्रिया सुळे म्हणाल्य़ा, ``राज्यात पाऊस पडला किंवा दुष्काळ पडला की दिल्ली वाले कधी येत नाही. पण निवडणुकीत दिल्लीची वारी महाराष्ट्रात येते.  शरद पवार यांनी काय केले, एवढेच ते ओरडतात. पाच वर्षांत या सरकारच्या चुकीच्या धोरणाममुळे मोठा फटका बसला आहे .दौंड तालुक्यात बारामती बरोबर रमेश थोरात यांना निवडुन दिले पाहीजे. जर थोरात हे एक लाखाच्या घरात निवडुन आले तर गुलाल खेळायला मी दौंडला येणार असल्याचे सुळे यांनी सांगतात टाळ्याचा कडकडात होवून एकच जल्लोष झाला.

रमेश थोरात म्हणाले, ``जिल्हा बॅंकेला एकशे दोन कोटी नफा झाला.मात्र,भिमा पाटस साखर कारखान्याकडे मोठया प्रमाणात कर्जाची थकबाकी आहे. माझ्या काळात भिमा पाटसकडे 38 कोटी कर्ज होते. तसेच 75 कोटींची साखर शिल्लख होती. कारखान्याचे वाटोळे केले आहे.पुढील उमेदवाराने सर्वांचा विश्वास घात केला आहे. महादेव जानकरांची फसवणुक केल्यामळे धनगर समाज त्यांना मतदान करणार नसल्याचे अनेकांनी मला सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com