भ्रष्टाचाराच्या आरोपाने केला य़ोगेश टिळेकरांचा घात

भ्रष्टाचाराच्या आरोपाने केला य़ोगेश टिळेकरांचा घात

पुणे : बिल्डरला मदत केल्याचा आरोप झाल्यानंतर गेल्या वर्षभरापासून योगेश टिळेकर यांच्यावर झालेले विविध आरोप व त्यानंतर सातत्याने वातावरण तापवत ठेवण्यात यशस्वी झालेले विरोधक हे टिळेकरांच्या पराभवाचे कारण ठरले आहे. शिवसेनेकडून मनापासून मदत झाली नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वसंत मोरे यांनी सुमारे 35 हजार मते मिळविली. दुसरीकडे कॉंग्रेस राष्ट्रवादी एकदिलाने लढल्याने हडपसर मतदारसंघात चेतन तुपे यांचा विजय सुकर झाला.

टिळेकर गेल्यावेळी चांगल्या मतधिक्‍याने निवडून आले होते. शहरात निवडून आलेल्या आठ आमदारांमध्ये टिळेकर हे सर्वात कमी वयाचे आमदार होते. मात्र, टिळेकरांना यश टिकवून ठेवता आले नाही. वास्तविक पक्षाने त्यांच्याकडे विश्‍वासाने मोठी जबाबदारी दिली होती. भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्षपद त्यांच्याकडे सोपवले आहे.

बिल्डरला मदत केल्याचा आरोप झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार वसंत मोरे यांनी हाच विषय सातत्याने लावून धरला. टिळेकरांना आमदार होऊ द्यायाचे नाही असा चंग मोरे यांनी बांधला. त्यासाठी टिळेकर यांना अडचणीत आणण्याची एकही संधी मोरे यांनी सोडली नाही. तुपे यांच्याकडून टिळेकर केवळ दोन हजार सातशे मतांनी पराभूत झाले. या विजयात वसंत मोरे यांचाच वाटा मोठा असला तरी त्याचा फायदा राष्ट्रवादीच्या तुपे यांना झाला आहे. मोरे यांनी सुमारे 35 हजार मते मिळविली. त्यामुळेच तुपे यांचा विजय सुकर झाला. या निवडणुकीत मुळात टिळेकर यांना उमेदवारी मिळणार नाही, अशी चर्चा सुरवातीपासून होते.

हा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यात येणार असल्याची चर्चादेखील सुरू झाली होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टिळेकर यांच्या बाजूने कौल दिल्याने त्यांची उमेदवारी निश्‍चित झाली. मतदारसंघाचे राजकीय गणित व सामाजिक समीकरण याचा विचार करून टिळेकर यांना पुन्हा संधी देण्यात आली. मात्र, टिळेकरांना पुन्हा निवडून आणण्याचा प्रयत्न फसला यात शंका नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com