why sena and bjp could not form alliance? | Sarkarnama

मुलायम आणि मायावती एकत्र येतात मग सेना आणि भाजपने का येऊ नये? : फडणवीस

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 30 ऑक्टोबर 2018

पुणे : मुलायमसिंह आणि मायावती हे दोन नेते राजकारणासाठी एकत्र येतात. मग शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती का होऊ नये, असा सवाल करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतांची विभागणी टाळण्यासाठी शिवसेनेशी युती करण्याची आमची भूमिका आहे, असे आज स्पष्ट केले.

एका वृत्तवाहिनिला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपले आणि उद्धव ठाकरे यांचे संबंध चांगले आहेत. शरद पवार यांना सार्वजनिक कार्यक्रमात भेटतो. तसेच मित्र असलेल्या ठाकरे यांनाही भेटतो. त्या भेटी मिडीयासमोर होत नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.

लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुका या वेगळ्या घ्याव्यात, अशी माझी भूमिका आहे. शिवसेना आणि भाजपची युती गेल्या विधानसभा निवडणुकीत पाच जागांवरून तुटली होती. या वेळी तसे होऊ नये म्हणून आतापासूनच चर्चा करावी, असे भाजपचे मत आहे. राज्यात २०१९ नंतर मीच मुख्यमंत्रिपदी राहणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख