why sangraram jagtap not get ministerial berth | Sarkarnama

जगताप यांना मंत्रीपद न दिल्याने कार्यकर्ते नाराज

मुरलीधर कराळे
मंगळवार, 31 डिसेंबर 2019

महाविकास आघाडीने मंत्रीमंडळाचा विस्तार करताना नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांना मंत्रीपद दिले नाही, त्यामुळे कार्यकर्त्यांतून नाराजी व्यक्त होत आहे.

नगर :  महाविकास आघाडीने मंत्रीमंडळाचा विस्तार करताना नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांना मंत्रीपद दिले नाही, त्यामुळे कार्यकर्त्यांतून नाराजी व्यक्त होत आहे.

आमदार जगताप यांनी यापूर्वीच्या सर्व निवडणुका घड्याळाच्या चिन्हावर लढविल्या आहेत. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी डाॅ. सुजय विखे पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून कोणी लढण्यास तयार नव्हते, त्यामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जगताप यांना लोकसभेची निवडणूक लढविण्यासाठी गळ घातली होती. त्यांचा शब्द प्रमाण माणून जगताप यांनी विखे पाटील यांना कडवी लढत दिली.
 यानंतरच्या काळात अनेक दिग्गजांनी राष्ट्रवादी काॅंग्रेस सोडला, तथापि, जगताप यांनी पवार यांची साथ सोडली नाही. त्यामुळेच विधानसभेलाही त्यांना उमेदवारी मिळाली. या निवडणुकीत ते चांगल्या मतांनी विजयी झाले. नगर शहरात दुबळ्या झालेल्या राष्ट्रवादीला ताकद देण्याचे काम जगताप यांनी केले.

त्यांची ही दुसरी टर्म आहे. त्यामुळे मंत्रीपदी त्यांचीच वर्णी लागेल, असे सर्वांना वाटले होते. तथापि, मंत्रीमंडळाच्या विस्तारात मात्र त्यांना संधी मिळाली नाही, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. असे असले, तरी आगामी काळात शरद पवार हे आमदार जगताप यांना मोठी संधी देतील, असा विश्वास कार्यकर्त्यांना वाटतो आहे.

 

दरम्यान, आता मंत्रीपद मिळण्याच्या शर्यतीत आमदार जगताप होते. राष्ट्रवादीच्या इतर आमदारांच्या तुलनेत ते अनुभवी व दुसरी टर्म जिंकणारे होते. याबरोबरच नगर शहरातील दिग्गज समजल्या जाणाऱ्या शिवसेनेचे उमेदवार अनिल राठोड यांचा त्यांनी दोनदा पराभव केला होता.

इतर सर्वच आमदार पहिल्यांदाच विधानसभेवर गेले होते. असे पोषक वातावरण असतानाही आमदार जगताप  यांचे मंत्रीपद हुकल्याची चर्चा सुरू आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख