पंकजा मुंडे यांनी सांगितला वेळेत उपस्थित न राहण्याचा फंडा - Why Pankaja Munde Comes late | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल

पंकजा मुंडे यांनी सांगितला वेळेत उपस्थित न राहण्याचा फंडा

मुरलीधर कराळे
बुधवार, 10 जानेवारी 2018

राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे कोणत्याही कार्यक्रमात वेळेत उपस्थित राहू शकत नाहीत, हे सर्वश्रूत आहे. पण त्यामागचे रहस्य त्यांनी काल नगरमध्ये स्पष्ट केले. ''माझा बाप कधी वेळेत उपस्थित राहिला नाही, तर मी कसे येणार,'' असे सांगून ''रस्त्याने येताना लोक गाडी थांबवितात. सत्कार करतात. सेल्फी काढतात. लोकांना नाराज करणं आम्हाला कधी जमलंच नाही,'' असे मुंडे यांनी सांगताच उपस्थित महिलांनी टाळ्या वाजल्या.

नगर : राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे कोणत्याही कार्यक्रमात वेळेत उपस्थित राहू शकत नाहीत, हे सर्वश्रूत आहे. पण त्यामागचे रहस्य त्यांनी काल नगरमध्ये स्पष्ट केले. ''माझा बाप कधी वेळेत उपस्थित राहिला नाही, तर मी कसे येणार,'' असे सांगून ''रस्त्याने येताना लोक गाडी थांबवितात. सत्कार करतात. सेल्फी काढतात. लोकांना नाराज करणं आम्हाला कधी जमलंच नाही,'' असे मुंडे यांनी सांगताच उपस्थित महिलांनी टाळ्या वाजल्या.

नगरला सक्षम महिला महोत्सव व साईज्योती स्वयंसहायता यात्रा या उपक्रमांतर्गत प्रदर्शनास मुंडे यांनी भेट दिली. कार्यक्रम पत्रिकेत दुपारी अडीच वाजता येणार, अशी वेळ दिली होती. तसा शासकीय दौराही निश्चित झाला होता. गहिनीनाथ गडावर सकाळी सुरू होणारा कार्यक्रम उशिरा सुरू झाला. त्यानंतर मुंडे पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव येथे आमदार मोनिका राजळे यांना भेटण्यासाठी गेल्या. तेथे झालेला उशिर लक्षात घेऊन जिल्हा माहिती कार्यालयाने सुधारीत दौरा पाठविला. त्यामध्ये पंकजा मुंडे साडेतीन वाजता नगरला पोचतील असे सांगितले होते. परंतु, तिही वेळ मुंडे यांनी पाळली नाही. त्या नगरला पोचल्या पाच वाजता. हा कार्यक्रम उशिरापर्य़ंत चालला.

कार्यक्रमास उशिर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून मुंडे यांनी उशिरा येण्याचे कारण स्पष्ट केले. मुंडे म्हणाल्या, ''गांधी साहेब, तुम्ही तीन टर्म खासदार आहेत. मी कधी वेळेवर आले का? माझा बाप कधी वेळेवर आला का? आपण म्हणतो ना, तुझ्या बापाला जमलं नाही, तर तुला काय जमनार? त्याचं गुढ मला आता कळलं. माझ्या वडिलांना नाही जमलं, ते का नाही जमलं, ते मला आज कळालं. मी सकाळी वेळेत बाहेर पडले. पोलिसांची गाडी आली नव्हती, सिक्युरिटी नव्हती, तरीही मी माझी गाडी घेऊन सकाळी आठ वाजता निघाले. पण मला येथे तीन वाजता पोचायचे होते, पण मी येथे आले साडेपाच वाजता. पण काय करणार? लोक प्रत्येक चौकात, प्रत्येक गावात झुंडीच्या झुंडीने थांबून माझा सत्कार करतात. मग त्यांचे फोटो, सेल्फी हे चालू असते. लोकांना नाराज करायचं आमच्या घराला कधी जमलंच नाही कधी," असं म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख