आव्हाडांनाही कोरोनाबाधिताचे नाव जाहीर केले होते..त्यांच्यावरही गुन्हा दाखल करा : डावखरे

गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधातनिरंजन डावखरे आता आक्रमक झाले आहेत..
Niranjan Davkhare - Aavhad
Niranjan Davkhare - Aavhad

पुणे :  कोरोना रुग्णाचे नाव म्हणून स्वत:च्या जवळच्या नातलगाचे नाव जाहीर झाल्यानंतर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी वाहिन्यांवर हल्लाबोल चढवला आहे. त्यातून एका इंग्रजी वृत्तवाहिनीला गृह विभागाने नोटीस बजावली आहे. यावरून आता आव्हाड यांचे पारंपरकि विरोधक व भाजपचे ठाणे जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी आव्हाड यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला असून एका वृत्त वाहिनीवरील कार्यक्रमात काही दिवसांपूर्वी आव्हाडांनी कोरोनाबाधित एका पत्रकाराचे नाव जाहीर केले होते, याची आठवण करून देत आता गृहविभाग आव्हाड यांच्यावर कारवाई करणार का, अशी विचारणा डावखरे यांनी केली आहे. 

आव्हाड व राष्ट्रवादीच्या दबावात वागत असलेल्या गृहविभागाने कोरोनाबाधित पत्रकारांचे जाव जाहीर केल्यासंबंधी आव्हाडांवर आता गुन्हा दाखल करण्याची हिंमत दाखवावी, असे  आव्हान  डावखरे यांनी दिले. याबाबात पोलिस आय़ुक्त विवेक फणसाळकर यांना त्यांनी पत्र पाठवले आहे. मुंब्रा-कळवा भागातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याबद्दल चर्चा सुरू असताना आव्हाड यांनी तेव्हा नाव जाहीर केले होते. 

ठाण्यात आव्हाड विरुद्ध डावखरे असा जुना सामना असून त्याला गेल्या काही दिवसांत पुन्हा धार चढली आहे. आव्हाडांवर टीका करणाऱ्या एका अभियंत्याला मारहाण झाल्याचे प्रकरण ठाण्यात गाजले. ही मारहाण आव्हाड यांच्यादेखत, त्यांच्या बंगल्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि अंगरक्षकाने केल्याचे यासंबंधीच्या पोलिस तक्रारीत म्हटले होते. आपल्याला ही मारहाण माहीत नसल्याचा दावा आव्हाड यांनी केला होता. पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांना अटक केली होती. त्यात आव्हाड यांच्या पीएचाही समावेश होता. मारहाण झालेला अनंत करमुसे याने आव्हाड यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती. त्यावरून सोशल मिडियातही वाद रंगला होता. करमुसे याने थेट नंतर राज्यापालांची भेट घेतली होती. तसेच भाजपने आव्हाड यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली होती.

त्यानंतर आव्हाड यांच्या संपर्कातील एका पोलिस अधिकाऱ्याची कोरोना चाचणी पाॅझिटिव्ह आल्यानंतर आव्हाड यांनी घरच्यांसह जवळपासच्या इतर मंडळींचीही चाचणी करून घेतली. त्यातील आठ जणांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून आव्हाड यांनी ब्लाॅग लिहून आपल्याला आणि आपल्या घऱच्या मंडळींनाही कसे बदमान केले जात आहे, याबद्दल सविस्तर लिहिले होते. तसेच मी 80 हजार लोकांच्या रोजच्या जेवणाची व्यवस्था कोरोनाच्या संकटात पाहिली, ही माझी चूक होती का, असा सवालही उपस्थित केला होता. माझ्या घरच्या मंडळींची नावे विनाकारण कोरोनाबाधिक म्हणून जाहीर केल्याबद्दल त्यांनी कारवाईची मागणी सुरवातीला केली होती. त्यानुसार अनिल देशमुख यांनी कारवाईचे आदेश दिले. त्यांच्या या आदेशाबद्दल आव्हाड यांनी आभार मानले. पण माफ करा आणि विसरून जा, असाही सल्ला देत ही कारवाई थांबविण्याचे आवाहन केले होते. तसेच आपणही या संदर्भात पोलिस तक्रार करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com