आणि बागडेंनी मेलवर आलेला अजित पवारांचा राजीनामा मंजूर केला

..
Haribhau_Bagde
Haribhau_Bagde

औरंगाबाद : कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातून भाजप-शिवसेनेत प्रवेश होत आहे. प्रवेशापुर्वी आमदारकीचा राजिनामा देण्यासाठी काही आमदारांना विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे औरंगाबादेत यावे लागले.

यामूळे बरीच धावपळ पक्षांतर करणाऱ्यांना आणि स्वत: हरिभाऊ बागडेंना करावी लागली होती. त्यानंतर बागडे यांनी राजिनामा देणाऱ्या आमदारांना मेलची मुभा दिली आहे. 

या सवलतीचा पहिला लाभ राष्ट्रवादीचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला. मेलवर आलेल्या राजिनामा मंजुर करण्याची ही बहुदा पहिली वेळ आहे.

आमदाराने विधानसभा अध्यक्षांना प्रत्यक्ष भेटूनच राजीनामा द्यावा असा नियम आहे . त्यामुळे फोनवर बोलून आणि मेलवर राजीनामा स्वीकारून मंजूर करता येऊ शकतो का या चर्चेला आता तोंड फुटले आहे . 

शिवसेनत प्रवेश करणारे राष्ट्रवादी आमदार दिलीप सोपल, आमदार भास्कर जाधव आणि सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांना राजिनामा देण्यासाठी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचा शोध घ्यावा लागला होता. अगदी मतदारसंघातील खेड्यापाड्यात जाऊन तेव्हा राजीनामे देऊन ते मंजुर करून घेण्यात आले होते.

त्यानंतर गेल्या आठवड्यात बागडे यांनी आमदारांना राजीनामा देण्यासाठी माझ्याकडे येण्याची गरज नाही, मेलवर पाठवेलला राजीनामा फोनवरून बोलल्यानंतर मंजूर केला जाईल असे स्पष्ट केले होते.
त्यानंतर आठवड्याभरातच अजित पवार यांनी मुंबईत विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयात दिलेला राजीनामा, मेलवर मागवून बागडे यांनी मंजुर केला. अजित पवार यांनी मुंबईतील कार्यालयातूनच विधानसभा अध्यक्षांशी संपर्क साधला आणि तो मंजुर करण्याची विनंती केली होती.

प्रत्यक्ष बोलणे झाल्यामुळे बागडे यांनी आपल्या शहरातील संपर्क कार्यालयात मेलवर अजित पवारांचा राजीनामा मागवून घेतला आणि तो मंजूर केल्याचे त्यांना सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com