मुंडे साहेबांवर ती वेळ आली तेव्हा देवेंद्र फडणवीस का गप्प बसले?

...
gopinath munde-fadanavis and shendage
gopinath munde-fadanavis and shendage

पुणे : जेव्हा गोपीनाथ मुंडे यांच्या हाकलपट्टीचा ठराव भाजपमध्ये मांडला जात होता; तेव्हा मी त्याला जोरदार विरोध केला. तेव्हा देवेंद्र फडणवीस हे मात्र गप्प बसले होते. ते तेव्हा काहीच बोलले नाहीत,"अशी टिका माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी केली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ,'प्रकाश शेंडगे यांनी गोपीनाथ मुंडे यांना त्रास दिला, असा आरोप केला होता. त्या आरोपाला 'सरकारनामा'शी बोलताना शेंडगे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

"गोपीनाथ मुंडे यांच्या हाकलपट्टीचा ठराव आला तेव्हा मी, संभाजी पवार, सुरेश हाळवणकर या आमदारांनी त्याला विरोध केला. तेव्हा फडणवीस गप्प बसले होते. तेव्हा त्यांनी मुंडेसाहेबांची बाजू का घेतली नाही," असा सवाल शेंडगे यांनी विचारला.

"जसं कटाप्पाने बाहुबलीला का मारले, याचे उत्तर मिळत नाही तसेच एकनाथ खडसे, गणेश हाके, बाळासाहेब सानप यांना उमेदवारी का मिळाली नाही, याचे उत्तर मिळत नाही. महादेव जानकर यांच्यासारख्या लढाऊ नेत्यांचे उमेदवार कोणी पळवून नेले?जानकर यांनी दुःखाने मीडियासमोर बोलताना 'मला दगा दिला' असे सांगितले. ही वेळ त्यांच्यावर कोणी आणली,असा सवाल शेंडगे यांनी विचारला.

"मी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. माझ्यासारखा कोणाचाही  प्रवेश झाला नव्हता. मलाही उमेदवारी नाकारली. मी मुंडेसाहेबांच्या जवळचा होतो म्हणूनच मला उमेदवारी दिली नाही. मी सावलीसारखा मुंडे यांच्यासोबत होतो. मात्र माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मात्र मी त्यांना त्रास दिला असे म्हणत आहेत. या उलट्या बोंबा आहेत,"असा दावा त्यांनी केला.

बारामतीत "२०१४ साली बोलताना फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देणार असं सांगितलं होतं मग पाच वर्षांत का आरक्षण दिल नाही? फडणवीस यांनी धनगर समाजाची फसवणूक केली आहे,"असे शेंडगे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com