नगरसेवक बाल्या बोरकर महापौरांवर का चिडले ? 

शहरालगतच्या हुडकेश्‍वर, नरसाळ्याचा आराखडा तयार करताना शेतीमध्ये आरक्षण टाकण्यात आले. बाहेरचे अधिकारी आराखडा तयार करतात. त्यांच्याऐवजी शहराची माहिती असलेल्या अधिकाऱ्यांची या कामी नियुक्ती करावी, अशी सूचना ज्येष्ठ नगरसेवक बाल्या बोरकर यांनी केली होती. परंतु या सूचनेकडे दुर्लक्ष करीत कुठलेही निर्देश महापौरांनी दिले नाही. त्यामुळे सत्ताधारी बाकावरील ज्येष्ठ नगरसेवक बाल्या बोरकर महापौरांवर जाम चिडले. 'नगरसेवकांची तुम्हाला गरज नाही काय?' असे म्हणत त्यांनी महापौरांवर राग काढला.
नगरसेवक बाल्या बोरकर महापौरांवर का चिडले ? 

नागपूर : शहरालगतच्या हुडकेश्‍वर, नरसाळ्याचा आराखडा तयार करताना शेतीमध्ये आरक्षण टाकण्यात आले. बाहेरचे अधिकारी आराखडा तयार करतात. त्यांच्याऐवजी शहराची माहिती असलेल्या अधिकाऱ्यांची या कामी नियुक्ती करावी, अशी सूचना ज्येष्ठ नगरसेवक बाल्या बोरकर यांनी केली होती. परंतु या सूचनेकडे दुर्लक्ष करीत कुठलेही निर्देश महापौरांनी दिले नाही. त्यामुळे सत्ताधारी बाकावरील ज्येष्ठ नगरसेवक बाल्या बोरकर महापौरांवर जाम चिडले.  'नगरसेवकांची तुम्हाला गरज नाही काय?' असे म्हणत त्यांनी महापौरांवर राग काढला. 

राज्य सरकारची महापालिकेला चपराक
हुडकेश्‍वर, नरसाळ्याचा आराखडा राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला होता. परंतु हा आराखडा राज्य सरकारने नाकारत महापालिकेला जोरदार चपराक दिली. नव्याने आराखडा तयार करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिल्याचे नगर रचनाचे सहायक संचालक गावंडे यांनी नमुद केले. टाऊन प्लानिंग स्किम तयार केले, परंतु, त्यात रस्त्याचे आरक्षण केले नसल्याने शासनाने मे महीन्यात आराखडा नाकारत नव्याने तयार करण्याचे निर्देश दिल्याचे गावंडे म्हणाले. 

नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या वाढीव किमतीला मंजुरी
नाग, पिवळी व पोरा नदीच्या पुरुज्जीवन प्रकल्पाची किंमत 1100 कोटींनी वाढली आहे. वाढीव किमतीला मंजुरी देण्याचा प्रस्तावालाही सभागृहाने मंजुरी दिली. नवीन किमतीचा आराखडा तयार करून केंद्र व राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. जुना आराखडा 1200 कोटींचा होता. तीन वर्षात या प्रकल्पाची किंमत 2400 कोटींवर पोहोचली. 

शहर विकासाचा नवीन आराखडा 2020 मध्ये तयार होणार आहे. शहर विकास आराखडा तयार करताना त्यावर लक्ष ठेवण्यासाठी सत्तापक्ष नेत्याच्या अध्यक्षतेत सर्वपक्षीय सदस्य व अधिकाऱ्यांचा समावेश असलेली समिती गठीत करण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी सभागृहात दिले. 

हुडकेश्‍वर, नरसाळ्यासाठी नवीन विकास आराखडा तयार करण्याच्या प्रस्तावाला आज सभागृहात मंजुरी मिळाली. हुडकेश्‍वर, नरसाळाप्रमाणे शहराचा विकास आराखडाही तयार होणार आहे. या प्रस्तावावर चर्चेदरम्यान प्रवीण दटके यांनी हुडकेश्‍वर-नरसाळा व नागपूरचा एकत्र विकास आराखडा करणे शक्‍य आहे काय? असा सवाल उपस्थित केला. तांत्रिक कारणांनी ते शक्‍य नसल्याचे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले. चर्चेदरम्यान दटके यांनी शहराचा आराखडा तयार होत असताना यावर देखरेख ठेवण्यासाठी सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांच्या अध्यक्षतेत समिती गठीत करावी, यात अधिकाऱ्यांसह सर्वपक्षीय नरसेवकांचा समावेश करण्याची सूचना केली. यावर महापौरांनी प्रशासनाना निर्देश दिले. ही समिती नव्या आराखड्याबाबत दर सात दिवसांनी आढावा घेईल. सभागृहात यशवंत स्टेडियम परिसराच्या विकासासाठी 17.53 एकर जागेच्या वापर बदलवून वाणिज्यिक वापरासाठी करण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली. याशिवाय झिंगाबाई टाकळी, बोरगाव, परसोडी येथे जलकुंभासाठी जागा आरक्षणाच्या प्रस्तावालाही हिरवा झेंडा दाखवण्यात आला. 
----------

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com