राणेंच्या भाजप प्रवेशासाठी शिवसेनेला विचारण्याची गरज काय?: एकनाथ खडसे 

राणेंच्या भाजप प्रवेशासाठी शिवसेनेला विचारण्याची गरज काय?: एकनाथ खडसे 

जळगाव :कोणाला कोणत्या पक्षात घ्यायचे हा त्या-त्या पक्षाचा अधिकार आहे. त्यामुळे नारायण राणे यांना भाजपत घ्यायचे असेल तर शिवसेनेला विचारण्याची गरज काय, असे परखड मत माजी मंत्री व भाजपचे नेते एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केले. 

जळगाव येथील एमआयडीसी भागात बालाणी रिसोर्ट येथे भाजपच्या कोअर कमेटीच्या बैठकिस ते उपस्थित होते. यानंतर वृत्तवाहीनीशी बोलतांना ते म्हणाले कि नारायण राणे भाजपत प्रवेश करणार आहे कि नाही, याची मला माहिती नाही, परंतु बऱ्याच दिवसापासून ते प्रवेश करणार असल्याचे मी ऐकतो आहे. त्यांना पक्षात घेण्यासाठी शिवसेनाचा दबाव घेण्याची भाजपने गरज नाही.

भाजपत त्यांना घ्यायचे का नाही? हे शिवसेनेला विचारण्याची काहीच गरज नाही. त्यांना घेण्याबाबतचा संपूर्ण अधिकार भाजपचा आहे. ज्या-त्या पक्षाचा तो अधिकार आहे. छगन भुजबळ यांना शिवसेनेत घेण्यात येत असेल त्यांनीही भाजपला विचारण्याची काहीही गरज नाही तो त्यांचा अधिकार आहे. शेवटी मित्र पक्ष असले तरी काही निर्णय घेण्याचे अधिकार दोघांना स्वतंत्र आहेत,आणि ते घेवू शकतात, असे मत खडसे यांनी व्यक्त केले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com