फडणविसांची खुर्ची हिसकवणाऱ्य़ा शिवसेनेला अमृतावहिनींचा टोला!

मुख्यमंत्र्यांची पत्नी म्हणून अमृता फडणवीस नेहमीच गेल्या पाच वर्षांत चर्चेत राहिल्या. सत्ता गेल्यानंतरही त्यांनी राजकीय टीका सुरू केली आहे.
amruta fadanvis criticizes shivsena
amruta fadanvis criticizes shivsena

पुणे : माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सहसा राजकारणात लक्ष घालत नाहीत. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता या याला अपवाद ठरल्या आहेत. देवेंद्र यांची मुख्यमंत्रिपदाची खुर्ची हिसकावून घेणाऱ्या शिवसेनेवरील राग अमृता यांनी व्यक्त केला.

अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर ट्विट करत शिवसेनेवर निशाणा साधला. त्याला निमित्त घडले ते औरंगाबाद येथील नियोजित बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे “शिवसेना ही ढोंगी आहे. आपल्या सोयीप्रमाणे ते झाडांच्या कत्तलीसाठी विरोध करतात. तुम्हाला दलाली मिळाली की असे काम तुम्ही करता,” असे ट्वीट करत त्यांनी शिवसेनेला डिवचले.

भाजप सरकार गेल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने मिळून सत्तास्थापन केली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे कॉलनीतील मेट्रो कारशेडसाठी झाडांच्या तोडकामावर स्थगिती आणली. यानंतर सर्वांचे लक्ष औरंगाबादमधील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाकडे लागले होते. कारण या स्मारकासाठी शिवसेना अनेक झाडांची कत्तल करणार असल्याचे बोललं जात होते. तशा चर्चाही सुरु होत्या.

शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी फडणवीस यांना उत्तर दिले. औरंगाबाद येथील स्मारकासाठी एकही झाड तोडले जाणार नसल्याचे चतुर्वेदी यांनी स्पष्ट केले. तसेच सतत खोटे बोलणे हा मोठा आजार असून लवकर बरे व्हा, असा सल्लाही त्यांनी अमृतावहिनींना दिला आहे. झाडतोडीसाठी दलाली हे भाजपनेच वाढविलेले धोरण असल्याचा टोला चतुर्वेदी यांनी लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com