कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभेला दिसणार 'टीम सतेज'चे तेज

जिल्ह्याचे राजकारण करायचे असेल तर ते सरळपणाने करता येत नाही. यासाठी पाठीराख्यांची फौज उभी करावी लागते. ही फौज उभी करताना कार्यकर्त्यांनाही तेवढेच बळ द्यावे लागते. असे बळ देत माजी गृहराज्यमंत्री, आमदार सतेज पाटील यांनी मागील दहा वर्षांत संपूर्ण जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात कार्यकर्त्यांची फळी उभी करून, आपली राजकीय ताकद दाखवून दिली आहे. त्यांची ही ताकत वाढवण्यात युवा नेते ऋतुराज पाटीलही मदत करत आहेत. प्रत्येक मतदारसंघात मताचा गठ्ठा तयार केल्याने आमदार पाटील हे या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्याच्या राजकारणात केंद्रस्थानी राहणार आहेत. त्यांनी उभी केलेली "टीम सतेज', कोणाला फायद्याची आणि कोणाला त्रासाची ठरणार?, याचीच आता चर्चा होऊ लागली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभेला दिसणार 'टीम सतेज'चे तेज

कोल्हापूर : जिल्ह्याचे राजकारण करायचे असेल तर ते सरळपणाने करता येत नाही. यासाठी पाठीराख्यांची फौज उभी करावी लागते. ही फौज उभी करताना कार्यकर्त्यांनाही तेवढेच बळ द्यावे लागते. असे बळ देत माजी गृहराज्यमंत्री, आमदार सतेज पाटील यांनी मागील दहा वर्षांत संपूर्ण जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात कार्यकर्त्यांची फळी उभी करून, आपली राजकीय ताकद दाखवून दिली आहे. त्यांची ही ताकत वाढवण्यात युवा नेते ऋतुराज पाटीलही मदत करत आहेत. प्रत्येक मतदारसंघात मताचा गठ्ठा तयार केल्याने आमदार पाटील हे या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्याच्या राजकारणात केंद्रस्थानी राहणार आहेत. त्यांनी उभी केलेली "टीम सतेज', कोणाला फायद्याची आणि कोणाला त्रासाची ठरणार?, याचीच आता चर्चा होऊ लागली आहे.

करवीर विधानसभा मतदारसंघात गगनबावडा तालुक्‍यातील दोन्हीही जिल्हा परिषद सदस्य भगवान पाटील व बजरंग पाटील, संभाजी पाटणकर, पंचायत समितीचे बहुतांश आजी-माजी सभापती, जिल्हा परिषद सदस्य, सरपंच व पदाधिकारी सक्रिय आहेत. गगनबावडा तालुक्‍यातच आमदार पाटील यांचा साखर कारखाना आहे. या कारखान्याचे अध्यक्ष व संचालक मंडळ पाटील यांच्यासाठी कार्यरत आहे. "करवीर'मधून जिल्हा परिषद सदस्या रसिका अमरसिंह पाटील, "गोकुळ'चे माजी संचालक बाबासाहेब चौगले, वडणगे सरपंच सचिन चौगले, बाजार समिती संचालक दशरथ माने, शेतकरी संघ माजी संचालक प्रकाश पाटील, रावसाहेब पाटील, विजय पाटील, संपत दळवी, विश्‍वास कामिरे आदी मंडळी 'टीम सतेज'ची धुरा सांभाळत आहेत.

चंदगड विधानसभा मतदारसंघात गडहिंग्लज, चंदगड व आजरा तालुक्‍यांचा काही भाग येतो. या ठिकाणी गोडसाखर गडहिंग्लजचे उपाध्यक्ष संग्राम नलवडे, गडहिंग्लज पंचायत समिती उपसभापती व गोडसाखर गडहिंग्लजचे संचालक विद्याधर गुरबे, ऍड. दिग्वीजय कुराडे, तसेच विष्णुपंत केसरकर, आजरा नगरपंचायतचे गटनेते किरण कांबळे व नगरसेवक, केदारी रेडेकर समूह अध्यक्षा अंजनाताई रेडेकर, चंदगडचे माजी आमदार व्ही. के. चव्हाण-पाटील यांचे चिरंजीव सुरेश चव्हाण-पाटील, ओम साई समूहाचे प्रमुख संभाजीराव देसाई-शिरोलीकर, तात्यासो देसाई, तसेच साखर कारखान्यांचे काही आजी-माजी संचालक, निवडक सरपंच व उद्योजक आमदार पाटील गटाचे काम करत आहेत.

राधानगरी-भुदरगड मतदारसंघात भुदरगडमधून माजी आमदार दिनकरराव जाधव यांचे पुत्र माजी सभापती सत्यजित जाधव, मधुअप्पा देसाई, शामराव देसाई, सचिन घोरपडे, शंभूराजे देसाई, अभिषेक शिंपी व कॉंग्रेसची लॉबी आदी, तर राधानगरीतून भोगावतीचे माजी चेअरमन सदाशिवराव चरापले, बिद्रीचे माजी उपाध्यक्ष विजयसिंह मोरे, मोहन धुंदरे, सतीश बर्गे, वैभव तहसीलदार आदी मंडळी "टीम सतेज'चे काम करत आहेत. तर कागल विधानसभा मतदारसंघात विद्यमान सदस्य उमेश आपटे हे आमदार पाटील यांचे कट्टर समर्थक आहेत.

पन्हाळा-शाहूवाडीत माजी आमदार संजयसिंह गायकवाड यांचे पुत्र कर्णसिंह गायकवाड, महादेव पाटील हे काम पहात आहेत. हातकणंगलेत बाळासाहेब पाटील-चंदूरकर, महेश पाटील, राहुल खंजिरे, शशिकांत खवरे व त्यांचा गट पाटील यांचे काम करत आहे; तर शिरोळ तालुक्‍यात कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष सर्जेराव शिंदे, आनंदराव धनवडे (नृसिंहवाडी), विजय पाटील व हेमंत औटी (कुरुंदवाड) आदी प्रमुख मंडळी सतेज पाटील गटात सक्रिय आहेत.

'दक्षिण', 'उत्तर' घरचाच
कोल्हापूर दक्षिण विधानसभेचे नेतृत्व सतेज पाटील यांनी केले आहे. यावेळी ते पुन्हा या मैदानात असण्याचे संकेत देत आहेत; तर कोल्हापूर उत्तर हा आमदार पाटील यांचा घरचा मतदारसंघ आहे. कसबा बावड्यात आमदार पाटील यांची मोठी ताकत आहे. तसेच शहराच्या कानाकोपऱ्यात त्यांचे कार्यकर्ते विखुरले आहेत. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघांत असलेली त्यांची ताकत कोणालाही नाकारता येणार नाही. त्यांच्या या ताकतीचा फायदा आगामी विधानसभा निवडणुकीत युवा नेते ऋतुराज पाटील यांना होणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com