साईबाबांचा आर्शिवाद यंदा शिवसेनेला की विखे-थोरातांना?

शिर्डी लोकसभा मतदारसंघ म्हणजे अखिल भारतीय काँग्रेसचे सदस्य माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा संगमनेर, विरोधी पक्षनेते डॉ. राधाकृष्ण विखे-पाटील यांचा शिर्डी, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री मधुकर पिचड यांचा अकोला, अविनाश आदीक यांचा श्रीरामपुर या नेत्यांचा मतदारसंघ. याशिवाय युवक काँग्रेस आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस दोन्हींचे प्रदेशाध्यक्ष डॉ. सत्यजीत तांबे आणि संग्राम कोते-पाटील याच मतदार संघातले.
Balasaheb Thorat-Radhakrishna Vikhe-Baban Gholap
Balasaheb Thorat-Radhakrishna Vikhe-Baban Gholap

शिर्डी : साईबाबांच्या शिर्डीतील राजकीय चमत्कार म्हणजे राधाकृष्ण विखे-पाटील आणि बाळासाहेब थोरात या दिग्गजांच्या शिर्डी मतदारसंघात काँग्रेसचा पराभव. हा चमत्कार 2009 मध्ये स्वतः रामदास आठवलेंनी आणि 2014 मध्ये भाऊसाहेब वाकचौरेंनी अनुभवला. यंदा दोन्ही काँग्रेसच्या हेवीवेट नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागेल. त्यामुळे गतवेळी उमेदवारी हुकलेले माजी मंत्री बबन घोलप अन्‌ शिवसेना या दोघांनाही साईबाबांचा आर्शिवाद सोपा नाही. 

शिर्डी लोकसभा मतदारसंघ म्हणजे अखिल भारतीय काँग्रेसचे सदस्य माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा संगमनेर, विरोधी पक्षनेते डॉ. राधाकृष्ण विखे-पाटील यांचा शिर्डी, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री मधुकर पिचड यांचा अकोला, अविनाश आदीक यांचा श्रीरामपुर या नेत्यांचा मतदारसंघ. याशिवाय युवक काँग्रेस आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस दोन्हींचे प्रदेशाध्यक्ष डॉ. सत्यजीत तांबे आणि संग्राम कोते-पाटील याच मतदार संघातले. 

फेररचनेत तो अनुसुचित जातीसाठी राखीव झाला. येथून सलग नऊ वेळा डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी लोकसभेत प्रतिनिधीत्व केले. ही सगळी अनुकुलता असली तरी 2009 मध्ये दोन्ही काँग्रेसच्या पाठींब्यावर निवडणूक लढवलेले रामदास आठवले येथून 1.32 लाखांनी तर गत निवडणुकीत भाऊसाहेब वाकचौरे 1.99 लाखांनी पराभूत झाले. दोन्ही वेळा शिवसेनेचा उमेदवार जिंकला. हा निकाल अनेक राजकीय तज्ञांना धक्का देणारा होता. 

यंदा येथे दोन्ही काँग्रेसची आघाडी होईल. त्यात माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी मिळण्याची शक्‍यता आहे. शिवसेनेतर्फे विद्यमान खासदार लोखंडे इच्छुक आहेत. त्यात माजी मंत्री बबन घोलप यांची पुन्हा एकदा एंट्री झाली आहे. ते विविध कारणांनी मतदारसंघात हजेरी लावत आहेत. मात्र, या सगळ्यांत यंदा दोन्ही काँग्रेसच्या हेवीवेट नेत्यांच्या प्रतिष्ठेचा, राजकीय इभ्रतीचा प्रश्‍न आहे. मोदींविरोधात या भागात वातावरण तापलेले आहे. त्यामुळे उमेदवारांपेक्षा या नेत्यांची परिक्षा असल्याने यंदा शिवसेनेला साईबाबाच्या मतदारांचा आर्शिवाद मिळणे वाटते तेव्हढे सोपे दिसत नाही. 

बबनराव घोलपांचे काय होणार?
या मतदारसंघात 2014 मध्ये माजी मंत्री बबन घोलप यांची उमेदवारी निश्‍चित होती. मात्र न्यायालयाने त्यांना बेहीशेबी मालमत्ता प्रकरणात तीन वर्षे व एक लाखांचा दंड ठोठावला. ऐनवेळी त्यांची उमेदवारी रद्द झाली. यंदा घोलप शिर्डीत विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने दौरे करीत आहे. सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिलेल्या निकालाचा ते अभ्यास करणार आहेत. अनुकुलता असल्यास ते उमेदवारी करतील. उमेदवारी मिळाल्यावर साईबाबांच्या शिर्डीच्या मतदारांचा आर्शिवाद मिळतो का? याची उत्सुकता असेल. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com