भाजप आमदारांच्या विरोधात; भाजपचे कोण-कोण मुलाखत देणार

भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज (बुधवारी) विधानसभेसाठी उमेदवारी करू इच्छिणाऱ्यांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. त्यानिमित्ताने विदयमान आमदारांच्या विरोधात कोण-कोण उमेदवारीस सज्ज आहेत, तेही अधिकृतपणे कळणार आहे. मुलाखतीच्या वेळी शक्तीप्रदर्शन करण्यास बंदी केल्याने इच्छुकांना आपली बाजू स्वतःच भक्कमपणे मांडावी लागणार आहे.
BJP Logos
BJP Logos

नगर : भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज (बुधवारी) विधानसभेसाठी उमेदवारी करू इच्छिणाऱ्यांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. त्यानिमित्ताने विदयमान आमदारांच्या विरोधात कोण-कोण उमेदवारीस सज्ज आहेत, तेही अधिकृतपणे कळणार आहे. मुलाखतीच्या वेळी शक्तीप्रदर्शन करण्यास बंदी केल्याने इच्छुकांना आपली बाजू स्वतःच भक्कमपणे मांडावी लागणार आहे.

भाजपचे सरचिटणीस रामदास आंबटकर, जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड तसेच इतर नेते उपस्थित राहणार आहेत. त्यानुसार प्रत्येक मतदारसंघाला वेळ निश्चित करून देण्यात आली आहे. प्रत्येकाला केवळ अर्धा तास देण्यात आला आहे. त्यानुसार सकाळी ११ वाजता अकोले मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती होतील. त्यानंतर अनुक्रमे संगमनेर, कोपरगाव, शिर्डी, श्रीरामपूर, नेवासे, शेवगाव-पाथर्डी, श्रीगोंदा, पारनेर, राहुरी, नगर शहर व शेवटी कर्जत-जामखेड मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती होतील.

नगर शहरातून भाजपच्या वतीने नुकताच ठराव करून ही जागा भाजपलाच मिळावी, अशी मागणी होत आहे. त्यामुळे माजी खासदार दिलीप गांधी, सुवेंद्र गांधी, माजी आमदार अॅड. अभय आगरकर तसेच महापौर बाबासाहेब वाकळे हे इच्छुक म्हणून मुलाखतीला येण्याची शक्यता आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात लढतीसाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे पाटील तसेच राजेश चौधरी मुलाखत देवू शकतात. त्यामुळे या मतदारसंघातून कोण-कोण मुलाखत देणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

शिर्डी विधानसभा मतदारसंघातून गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची उमेदवारी निश्चित होईल, त्यामुळे या मतदारसंघातून इतर कोणीही इच्छुक उभे राहण्याची शक्यता नाही. श्रीरामपूर मतदारसंघातून माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे इच्छुक असल्याचे समजते. त्यांच्यासोबत अजून कोण-कोण इच्छुक आहेत, हे उद्या कळणार आहे. राहुरी विधानसभा मतदार संघातून आमदार शिवाजी कर्डिले यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याने त्यांना विरोधक म्हणून कोण मुलाखतीला येणार, याकडे मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.

नेवासे मतदारसंघातून मात्र उमेदवारीसाठी स्पर्धा असू शकते. आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यासह सचिन देसर्डा, नितीन दिनकर हे मुलाखत देण्याची शक्यता आहे. पाथर्डी-शेवगाव मतदारसंघातून आमदार मोनिका राजळे यांच्याविरोधात मागील काही दिवसांपासून भाजपअंतर्गत एक गट सक्रीय झाला आहे. त्यामुळे राजळे यांच्यासह कोणकोण मुलाखतीला येणार, याकडे लक्ष लागणार आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघातून पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. त्यांच्यासोबत इतर कोणी इच्छुक येणार का, हेही पाहणे औत्युक्याचे ठरणार आहे. श्रीगोंदे मतदार संघातून माजी मंत्री बबनराव पाचपुते हे मुलाखत देऊ शकतात. पारनेरमधून ज्येष्ठ नेते विश्वनाथ कोरडे व वसंत चेडे यांचीही मुलाखत देण्याची तयारी असल्याचे समजते.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com