who will shivsena cm udhav thackrey or ekanath shinde | Sarkarnama

शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण ? उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे की आणखी कोण ? 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

मुंबई : भाजप सत्ता स्थापनेचा दावा करणार नाही असा निरोप भाजपतर्फे राज्यपालांना दिल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी आता शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले आहे. सत्तास्थापनेची तयारी जर शिवसेनेने दाखविली तर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण स्वत: उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, संजय राऊत की आणखी कोण याची उत्सुकताही शिगेला ताणली गेली आहे. 

सत्तास्थापनेसाठी शिवसेनेचे सहकार्य मिळत नसल्याने आम्ही सत्ता स्थापन करून शकत नाही त्यामुळे ज्यांना सत्ता स्थापन करायची त्यांना शुभेच्छा असे सांगत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सत्तेपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. 

विधानसभा निकालानंतर भाजप सर्वाधिक जागा मिळविणारा पक्ष आहे. भाजपला 105 जागा मिळाल्या असून शिवसेनेला 56 जागा मिळाल्या आहेत. त्यानंतर राष्ट्रवादी 54 आणि कॉंग्रेसला 41 जागा मिळाल्या आहेत. भाजपपासून दूर गेलेल्या आणि भाजप खालोखाल जागा मिळविणाऱ्या शिवसेनेला राज्यपालांनी निमंत्रण दिले आहे. उद्या संध्याकाळी शिवसेनेला भेटीसाठी राज्यपालांनी निमंत्रण दिले आहे. 

शिवसेनेला कॉंग्रेस राष्ट्रवादी पाठिंबा देणार का ? राष्ट्रवादी सत्तेत असेल का ? कॉंग्रेस बाहेरून पाठिंबा देणार की सत्तेत सहभागी होणार असे अनेक प्रश्‍न आहेत. राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी वेळ दिल्यास त्यांना बहुमत स्पष्ट करावे लागले. हे सगळे असले तरी शिवसेनेचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण स्वत: उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, संजय राऊत की आणखी कोण हे पाहावे लागले.  
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख