अजित पवार पुणे झेडपी अध्यक्षपदासाठी कोणाला संधी देणार? : मावळचे पारडे जड

अजित पवार पुणे झेडपी अध्यक्षपदासाठी कोणाला संधी देणार? : मावळचे पारडे जड

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या आगामी अडीच वर्ष कालावधीच्या अध्यक्षपदासाठी जिल्ह्यातील सात तालुक्यात रस्सीखेच होणार आहे. या पदासाठी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसकडे सात तालुक्यांतील १६ महिला पात्र आहेत.

शिवाय खुल्या महिला गटातून अन्य प्रवर्गातील महिलाही पात्र असतात. आज घडीला राष्ट्रवादी कांँग्रेसच्या ४२ जिल्हा परिषद सदस्यांपैकी २४ महिला सदस्या आहेत. यापैकी १६ खुल्या प्रवर्गातून तर, उर्वरित आठ जणी विविध प्रवर्गातून  निवडून आलेल्या आहे.  

खुल्या गटातून निवडून आलेल्यांमध्ये बारामती, इंदापूर, दौंड, शिरुर, आंबेगाव, हवेली आणि मावळ या तालुक्यातील सदस्यांचा समावेश आहे. यापैकी मावळचा अपवाद अन्य सहा तालुक्यातील प्रत्येकी एक जण सध्या जिल्हा परिषदेचा पदाधिकारी आहे. आतापर्यंत विद्यमान पदाधिकारी असलेल्या तालुक्याला सलग दुसऱ्यांदा संधी न देण्याचे पथ्य राष्ट्रवादी काँग्रेसने पाळले आहे. या पथ्यानुसार सध्या मावळ तालुक्याचे पारडे जड आहे. त्यामुळे मावळातील शोभा कदम या अध्यक्ष होऊ शकतात.

शिवाय जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून आतापर्यंत मावळ तालुक्याला अध्यक्षपद मिळालेले नाही. दरम्यान, आजच्या आरक्षण सोडतीने अनेक दिग्गज पुरूष जिल्हा परिषद सदस्यांच्या आशेवर पाणी फिरले आहे.  

खुल्या गटातील महिला जिल्हा परिषद सदस्यांची नावे ;- 
1) तुळशी भोर (आंबेगाव)
2) अरुणा थोरात (आंबेगाव)
3) सुनीता गावडे (शिरूर)
4) स्वाती पाचुंदकर (शिरूर)
5) सविता बगाटे (शिरूर)
6) सुजाता पवार (शिरूर)
7) शोभा कदम (मावळ)
8) कल्पना जगताप (हवेली)
9) अर्चना कामठे (हवेली)
10) अनिता इंगळे (हवेली)
11) पूजा पारगे (हवेली)
12) राणी शेळके (दौंड)
13) रोहिणी तावरे (बारामती)
14) मीनाक्षी तावरे (बारामती)
15) वैशाली पाटील (इंदापूर)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com