कार्यकर्त्यांत उत्सुकता, नाशिकचे पालक छगन भुजबळ की दादा भुसे?

आज जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांचा निर्णय होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे नाशिकचा कारभार राष्ट्रवादीचे भुबळ यांच्याकडे की शिवसेनेचे दादा भुसे यांच्याकडे याची उत्सुकता वाढली आहे
Who Will Be Guardian Minster of Nashik Chagan Bhujbal or Dada Bhuse
Who Will Be Guardian Minster of Nashik Chagan Bhujbal or Dada Bhuse

नाशिक : जिल्ह्याला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि शिवसेनेचे कृषी मंत्री दादा भुसे हे दोन मंत्री मिळाले आहेत. दोघेही कॅबीनेट दर्जाचे मंत्री आहेत. त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री यापैकी कोण होणार याची प्रतिक्षा आहे. याबाबत शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस यांसह प्रशासनातही मोठी उत्सुकता आहे.

राज्यमंत्री मंडळाचा विस्तार होऊन खातेवाटप देखील झाले आहे. बहुतांश मंत्र्यांनी आपला कार्यभार स्विकारला आहे. या पार्श्‍वभूमीवर आज विधीमंडळाचे एक दिवसाचे अधिवेशन सुरु झाले आहे. त्यानंतर सायंकाळी मंत्रीमंडळाची बैटक आहे. या बैठकीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रसेच्या मंत्र्यांची बैठक पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत होईल. आज दिवसभराचा व्यग्र कार्यक्रम, गतीमान हालचाली या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांचा निर्णय होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे नाशिकचा कारभार राष्ट्रवादीचे भुबळ यांच्याकडे की शिवसेनेचे दादा भुसे यांच्याकडे याची उत्सुकता वाढली आहे.

श्री. भुजबळ यापूर्वी सलग पंधरा वर्षे मंत्री होते. श्री. भुसे गेली पाच वर्षे शेजारच्या धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. छगन भुजबळ ज्येष्ठ मंत्री आहेत. त्यांच्या कारकिर्दीत जिल्ह्यासह राज्यात अनेक लक्षणीय प्रकल्प उभे राहिले आहेत. त्यांच्या कारकिर्दीत मंजुरी मिळालेले अनेक प्रकल्प गेल्या पाच वर्षात गिरीश महाजन असतांना गती घेऊ शकले नाहीत. विशेषतः जिल्ह्यातील पर्यटन, बांधकाम, पायाभूत सुविधा यांसह शासकीय इमारतींचे प्रकल्प त्यात आहेत. 

यातील काही प्रकल्पांची श्री. भुजबळ यांनी महिनाभरापुर्वीच आढावा सादर करण्याच्या सुचना दिल्या आहेत. आगामी नाशिक जिल्हा बॅंक, विविध महत्वाच्या बाजार समित्या, देवळाली कॅन्टोनमेंट बोर्ड, नाशकि महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची तयारी भविष्यात होणार आहे. त्यादृष्टीने या दोन्ही पक्षांना विस्तारावर लक्ष केंद्रीत करावे लागले. त्यादृष्टीने पालकमंत्री कोण याची उत्सुकता दोन्ही पक्षांच्या नेते, कार्यकर्त्यांत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com