राणेंच्या होमपिचवर सत्तारूढ खेळाडू कोण? भास्कर जाधव की उदय सामंत?

नागपूरला राज्याचे अधिवेशन सुरू असताना खासदार नारायण राणे नागपुरात दाखल झाले. त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अकार्यक्षम मुख्यमंत्री असल्याची टीका केली. राणेंच्या टीकेला काही तासातच गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी उत्तर दिले. राणे विरूद्ध जाधव हा वाद जुनाच आहे. रत्नागिरीचे आमदार उदय सामंत आणि राणेंमध्येही राजकीय वैर टोकाचे आहे.
Who will get Ministrial Brith on Rane Homepeach Bhaskar jadhav or Uday Samant
Who will get Ministrial Brith on Rane Homepeach Bhaskar jadhav or Uday Samant

चिपळूण : महाविकास आघाडीच्या विरोधात भाजपचे खासदार नारायण राणे मैदानात उतरले आहेत. त्यांना होमपिचवर उत्तर देण्यासाठी महाविकास आघाडी कोणाला बळ देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अधिवेशन संपल्यानंतर ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची तयारी सुरू आहे. तीन दिवसात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागेल, याबाबत थांबलेली चर्चा पुन्हा सुरू आहे.

नागपूरला राज्याचे अधिवेशन सुरू असताना खासदार नारायण राणे नागपुरात दाखल झाले. त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अकार्यक्षम मुख्यमंत्री असल्याची टीका केली. राणेंच्या टीकेला काही तासातच गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी उत्तर दिले. राणे विरूद्ध जाधव हा वाद जुनाच आहे. रत्नागिरीचे आमदार उदय सामंत आणि राणेंमध्येही राजकीय वैर टोकाचे आहे. 

महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून राणेंनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टार्गेट केले होते. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणे पिता-पुत्र शिवसेनेच्या विरोधात वातावरण पेटवणार तसेच भाजप वाढीसाठी प्रयत्न करणार, हे निश्‍चित आहे. राणेंचे पारंपरिक शत्रू असलेले दीपक केसरकर, भास्कर जाधव, उदय सामंत असे तीन पर्याय शिवसेनेकडे आहेत. यापैकी कोणाला संधी मिळणार, याची उत्सुकता सर्वांना आहे.

भास्कर जाधव, उदय सामंत यांचा पर्याय

केसरकर यांनी महायुतीच्या सरकारमध्ये गृह आणि अर्थसारखे महत्त्वाचे राज्यमंत्रिपद सांभाळले. त्यांच्या मंत्रिपदाच्या पक्षवाढीसाठी कार्यकर्त्यांना फारसा उपयोग झाला नाही. सत्तेच्या काळात शिवसेना, भाजपमध्ये शितयुद्ध सुरू असताना केसरकर यांनी मुख्यमंत्र्यांची मर्जी मिळवणे, याला सर्वाधिक पसंती दिल्याची चर्चा आहे. भास्कर जाधव आणि उदय सामंत असे दोन माजी मंत्री महाविकास आघाडीकडे आहेत. यातील दोघांना मंत्रिपदाच्या रुपाने बळ देवून एकाकडे रत्नागिरीची तर दुसऱ्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याची जबाबदारी देण्याबाबत महाविकास आघाडीमध्ये खलबते सुरू असल्याची चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com