सोलापुरातील 'या' तिघांची लागणार मंत्रिमंडळात वर्णी?

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अद्याप शिवसेना-भाजप युतीच्या सरकारचे घोडे मंत्रिमंडळावरुन जागेवरुन पुढे सरकत नसल्याचे चित्र आहे. मात्र, युती सरकारमध्ये सोलापुरातील दोघांना कॅबिनेट तर एकाला राज्यमंत्रीपद मिळणार असल्याची चर्चा आहे. त्यामध्ये विजयकुमार देशमुख, तानाजी सावंत आणि संजय शिंदे अथवा राजेंद्र राऊत यांचा समावेश आहे, असे बोलले जात आहे.
Vijaykumar Deshmukh - Tanaji Sawant
Vijaykumar Deshmukh - Tanaji Sawant

सोलापूर  : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अद्याप शिवसेना-भाजप युतीच्या सरकारचे घोडे मंत्रिमंडळावरुन जागेवरुन पुढे सरकत नसल्याचे चित्र आहे. मात्र, युती सरकारमध्ये सोलापुरातील दोघांना कॅबिनेट तर एकाला राज्यमंत्रीपद मिळणार असल्याची चर्चा आहे. त्यामध्ये विजयकुमार देशमुख, तानाजी सावंत आणि संजय शिंदे अथवा राजेंद्र राऊत यांचा समावेश आहे, असे बोलले जात आहे.

सोलापूरचे शिवसेना संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांनी परजिल्ह्यातील भूम-परांड्याची जागा मिळविली. राजकारणात अशक्‍य काहीच नसते, हे त्यांनी दुसऱ्यांदा दाखवून दिले. तत्पूर्वी, त्यांना काही महिन्यांकरिता राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले. दरम्यान, त्यांनी चमकदार कामगिरी केल्याने शिवसेनेकडून सोलापूर जिल्ह्यात तानाजी सावंत यांच्या नावाची चर्चा असून शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून तब्बल 73 हजारांचे मताधिक्‍य घेत विजयकुमार देशमुख यांनी विजयाला गवसणी घातली. त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार मनोहर सपाटे, वंचित बहूजन आघाडीचे उमेदवार आनंद चंदनशिवे यांचा दारुण पराभव केला. मागील मंत्रिमंडळात विजयकुमार देशमुख यांना राज्यमंत्रीपद मिळाले मात्र, आता लिंगायत आमदार म्हणून त्यांना
राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेटपद मिळेल, अशी चर्चा आहे. 

तर माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविलेले संजय शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अपक्ष उमेदवारी भरली. अटीतटीच्या लढाईत शिवसेनेच्या उमेदवार रश्‍मी बागल अन्‌ अपक्ष उमेदवार नारायण पाटील यांना मागे टाकत संजय शिंदे यांनी विजय मिळवला.

दुसरीकडे राज्यात युती असतानाही माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी शिवसेनेचे उमेदवार तथा माजी मंत्री दिलीप सोपल यांचा पराभव केला. त्यांनी तत्काळ मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यामुळे राऊत अथवा शिंदे यांच्यातून एकाला राज्यमंत्रीपद मिळेल, अशीही चर्चा आहे.

सुभाष देशमुख यांची मोर्चेबांधणी
दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार सुभाष देशमुख यांची मतदारसंघावरील पकड सैल झाल्याचा अनुभव विधानसभा निवडणुकीत आला. नगरसेवक बाबा मिस्त्री यांना कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळाली अन्‌ त्यांनी मोठी मते मिळवली. त्यांनी आव्हान उभे केल्याने सुभाष देशमुख यांना 23 हजारांचे मताधिक्‍य मिळाले. दरम्यान, विजयानंतर त्यांनी आता राज्याच्या मंत्रिमंडळात पुन्हा संधी मिळावी यादृष्टीने केंद्रीयमंत्री नितीन गडकरी
 यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरु केल्याची चर्चा आहे. मात्र, शिवसेना-भाजप युती सरकारचे मंत्रिपदावरुन अडलेले घोडे कशाप्रकारे पुढे सरकते, यावर पुढील समीकरणे अवलंबून असल्याचे बोलले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com