शिवसेनेची सत्ता आल्यास पुणे जिल्ह्यातून शिवतारेंना संधी की आढळरावांना?

राष्ट्रवादीकडून अजित पवार यांचे नाव निश्चित मानले जात आहे.
शिवसेनेची सत्ता आल्यास पुणे जिल्ह्यातून शिवतारेंना संधी की आढळरावांना?

पुणे : राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांच्या संयुक्त आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यास, पुणे जिल्ह्यात या तीनही पक्षांचा प्रत्येकी किमान एक मंत्री असणार आहे.

यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस),  आमदार संग्राम थोपटे (काँग्रेस) यांची नावे आघाडीवर आहेत. पुणे शहर व जिल्ह्यात सेनेचा एकही आमदार नसल्याने, पक्षवाढीसाठी एक मंत्री देण्याचे सेनेचे धोरण असू शकते. यासाठी पुन्हा विजय शिवतारेंना संधी मिळणार की, ऐनवेळी शिवाजीराव आढळरावांना संधी मिळणार, याचीच चर्चा जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये रंगू लागली आहे.

दरम्यान, पाच वर्षाच्या खंडानंतर अजित पवार पुन्हा एकदा जिल्ह्याचे पालकमंत्री होणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना १९९९ मध्ये  झाल्यानंतर त्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार सत्तेत आले. त्यानंतर सलग १५ म्हणजेच २०१४ पर्यंत आघाडी सरकार सत्तेत होते.  या पंधरा वर्षातील तीन महिन्यांचा अल्प काळ उर्वरीत सर्व काळ अजित पवार हे पालकमंत्री होते.

आघाडीचा २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याने सत्तांतर झाले आणि सत्तांतरानंतर  भाजपचे गिरीश बापट जिल्ह्याचे पालकमंत्री झाले. दरम्यान, जिल्ह्यात शहर, जिल्ह्यात काँग्रेसचे दोनच आमदार आहेत. त्यात भोरचे संग्राम थोपटे आणि पुरंदरचे संजय जगताप यांचा समावेश आहे. जगताप हे पहिल्यांदाच निवडून आले असून थोपटे सलग तिसऱ्यांदा आमदार झाले आहेत. त्यामुळे ज्येष्ठतेनुसार थोपटे यांचे नाव अग्रक्रमाने राहणार आहे. माजी सहकारमंत्री आणि काँग्रेसचे तत्कालीन ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे थोपटे यांचा मंत्रीपदाचा मार्ग सुकर झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com