औरंगाबादेत मंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार?

जिल्ह्यात सर्वच्या सर्व सहा आमदार निवडूनदेणाऱ्या औरंगाबादेत मंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.
shivsena abd
shivsena abd

औरंगाबादः महाराष्ट्रातील सत्तापेच सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निकालाने निकाली लागण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यामुळे महाआघाडीच्या सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला असून जिल्ह्यात सर्वच्या सर्व सहा आमदार निवडून देणाऱ्या औरंगाबादेत मंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात शिवसेनेचे सगळे उमेदवार विजयी झाले. यात पैठण विधानसभा मतदारसंघातून पाचव्यांदा निवडून  येण्याचा विक्रम संदीपान भुमरे यांनी केला, तर पश्‍चिममधून संजय शिरसाट यांनी सलग तीनवेळा निवडून  येत हॅट्रीक साधली. त्यामुळे संभाव्य मंत्रीमंडळाच्या यादीत या दोघांपैकी एकाचा समावेश केला जाऊ शकतो असे बोलले जाते.

औरंगाबाद शहरातील मध्यचे आमदार प्रदीप जैस्वाल हे जुने निष्ठावान शिवसैनिक आहेत . त्यांनी प्रदीर्घ काळ जिल्हाप्रमुख पद सांभाळलेले आहे . ते औरंगाबादचे खासदारही होते तसेच यापूर्वी ते शिवसेना उमेदवाराविरद्ध बंडखोरी करून आमदार म्हणूनही निवडून आलेले होते . 

जिल्ह्यातील संभाव्य यादीत तिसरे नाव सिल्लोड-सोयगांव मतदारसंघातून विजयी झालेले अब्दुल सत्तार यांचे असू शकते अशीही चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीपुर्वीच सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. तसेच भाजपकडे असलेला हा मतदारसंघ सोडवून घेत तिसऱ्यांदा विजय देखील मिळवला.

शिवसेनेतील एकमेव अल्पसंख्याक चेहरा म्हणून सत्तार यांच्याकडे पाहिले जाते. भविष्यात मुस्लिम मते पक्षाकडे वळवण्यासाठी अब्दुल सत्तार यांना मंत्रीमंडळात स्थान दिले जाण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. राज्यात महाआघाडीचे सरकार येणार असल्याने तीन पक्षातील निवडक आमदारांचा समावेश मंत्रीमंडळात होणार आहे. त्यामुळे मराठवाड्यातून शिवसेनेच्या कोणत्या आमदारांना पक्षाकडून संधी दिली जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com